Desi Jugaad Video: पर्यावरणासाठी प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या बाटल्या किती घातक आहेत, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण, तरीही त्याचा वापर काही केल्या कमी होत नाही. देशभरात पाणी, कोल्ड्रिंक्सच्या हजारो प्लास्टिक बाटल्यांचा कचरा जमा होत आहे. इतकेच नाही तर विविध खाद्यपदार्थांसाठीदेखील प्लास्टिकचे रॅपर वापरले जात आहेत. त्यामुळे देशात प्लास्टिकवर बंदी असूनही त्याचा सर्रास वापर होताना दिसत आहे. पण, याच भंगारात जमा होणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा एका पठ्ठ्याने असा काही वापर केला आहे, जो पाहून तुम्हीही चकित व्हाल. या पठ्ठ्याने प्लास्टिकच्या बाटल्यांपासून चक्क चार भलीमोठी घरं उभारली आहेत.
रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवलेल्या घरांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यात एका व्यक्तीने रिकाम्या कोल्ड्रिंकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून घरं बनवली आहेत.
प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवले घर (Desi Jugaad Plastic Bottle Home Video)
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून एका बाजूला एक अशी चार घरं बांधली. बांधकाम साहित्याचा वापर करून त्याने एकावर एक बाटल्या रचून संपूर्ण भिंत बांधली होती. या भिंतीवर बाटल्या सहज दिसू शकतात. हा पुरावा आहे की, संपूर्ण घर प्रत्यक्षात प्लास्टिकच्या कोल्ड्रिंकच्या बाटल्यांनी बनलेले आहे. व्हायरल व्हिडीओमधील अशी घरं पाहून सोशल मीडिया युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. तसेच लोकांमध्येही हे प्लास्टिकचे घर चर्चेचा विषय बनले आहे.
Read More Trending Video : VIDEO : सलाम मुंबई पोलिस! लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत गेले अन् खाली कोसळले, पाहा भक्तांसोबत नेमकं काय घडलं?
प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवलेल्या घराचा व्हिडीओ @akashay_jakhar.1 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो पाहून लोक घर बांधणाऱ्या व्यक्तीचे कौतुक करत आहेत. या व्हिडीओवर आता युजर्सकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या व्हिडीओवर एका युजरने कमेंट केली आहे की, “खूप सुंदर.” दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, “हे खूप सुंदर आहे, पण घर उन्हात जास्त काळ टिकणार नाही, बाटल्या खराब होतील. मेहनत आणि पैसा दोन्ही वाया जाईल.”