Desi Jugaad Video : राज्यात सध्या थंडीची चाहूल लागली आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या वेळी तापमान घसरल्याचे अनुभवायला मिळतेय. त्यामुळे लोक उबदार कपडे, ब्लँकेट, रजई आणि हीटर बाहेर काढून ठेवत आहेत; तसेच घर उबदार ठेवण्यासाठी हीटर खरेदी करत आहेत. पण, हीटर खरेदी करणे सर्वांनाच शक्य होत नाही, कारण ते महाग तर असतातच शिवाय त्यामुळे विजेचे बिलदेखील अधिक येते. याचमुळे एका पठ्ठ्याने थंडीपासून वाचण्यासाठी चक्क विटेचा वापर करून घरच्या घरी हीटर तयार केला आहे. त्याचा हा देसी जुगाड वापरून बनवलेला हीटरचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण, हा जुगाडपासून बनवलेला हीटर धोकादायकदेखील ठरू शकतो, त्यामुळे युजर्स हा व्हिडीओ पाहून शॉक झाले आहेत. अनेकांनी हा हीटर म्हणजे एक प्रकारचे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे असे म्हटले आहे.

व्हिडीओमधील हीटर हा सामान्य हीटरसारखाच आहे, ज्यावर लोक अन्नही शिजवू शकतात. हा हीटर बनवण्यासाठी पठ्ठ्याने असा अनोखा जुगाड वापरला आहे की, पाहून लोक अवाक् झालेत. त्या व्यक्तीने विटेचा वापर करून हीटर बनवला. तो बनवण्यासाठी त्याने आधी करवतीच्या मदतीने विटेच्या मधील भाग पद्धतशीरपणे एका ओळीत कापला आहे.

Puneri pati in outside temple for couples funny photo goes viral on social media
PHOTO: “प्रेमी युगुलांना इशारा…” मंदिराबाहेर लावली खतरनाक पुणेरी पाटी; वाचून पोट धरुन हसाल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Shocking video If you eat roti made dough keeping fridge can make you sick
महिलांनो चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय?; ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
actor Nitin Chauhaan dies at 35
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन, ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

“तुम्हाला सगळचं फ्री पाहिजे का…” भर ट्रेनमध्ये टीटीने पोलिसाला फटकारले; VIDEO पाहून युजर्सचा संताप

विटेपासून बनवला हिटर

यानंतर त्या ओळींमध्ये तार फिट केली आणि तारेची दोन्ही टोकं वायरल जोडली. यानंतर विटेच्या मागच्या बाजूनी ती वायर ठेवली, नंतर खोलीत नेऊन ती वायर स्विचला जोडली. पण, त्याने हा जुगाड करताना एक मोठी चूक केली, ज्याचा व्हिडीओमध्ये उल्लेख नाही; परंतु कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी ती चूक निदर्शनास आणून दिली आहे.

D

या व्हिडीओतील चूक म्हणजे हीटरमधील लोखंडी तार जळल्यामुळे वीट तर पटकन गरम होतेय, पण त्यामुळे त्याच्या मागे जोडलेली वायरही खूप गरम होताना दिसतेय. अशाने शॉर्टसर्किट होऊ शकते. अनेकांनी सांगितले की, वीट इतकी गरम होतेय की तिला स्पर्शही करता येणार नाही. एकाने सांगितले की, हे मृत्यूचे साहित्य आहे, कारण यामुळे कोणालाही हानी पोहोचवू शकते. सध्या बाजारात स्वस्तात हीटर मिळतात, तेच हीटर विकत घेतले तर बरे होईल, असे अनेकांनी सांगितले.

“तुम्हाला सगळचं फ्री पाहिजे का…” भर ट्रेनमध्ये टीटीने पोलिसाला फटकारले; VIDEO पाहून युजर्सचा संताप

हा व्हिडीओ @monuexplorer या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केला आहे, ज्यावर अनेकांनी कमेंट्स करत हा फार धोकादायक प्रकार असल्याचे म्हटले आहे.

Story img Loader