Harsh Goenka Viral Video : जुगाड करण्याच्या बाबतीत भारतीयांचा हात कोणीही धरू शकत नाही. लोक काही वेळा असे काही जुगाड शोधून काढतात; ज्याचा कधी कोणी विचारही केला नसे. त्यात गेल्या काही वर्षांपासून अनेक ठिकाणी सोलर सिस्टीमवरील विजेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. गाव-खेड्यांमध्ये याचा सर्वाधिक वापर होताना दिसतो. तुम्ही आजवर सोलरवर चालणाऱ्या लाइट, बॅटरी वगैरे पाहिल्या असतील. पण, एका तरुणानं चक्क सोलर सिस्टीमवर चालणारी बाईक तयार केली आहे. जी बाईक पाहून CEAT टायरचे मालक देशातील प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका अवाकही झाले आहेत. त्यांनी या जुगाड सोलर बाईकचा व्हिडीओ पोस्ट करीत तरुणाचे कौतुक केले आहे.
उद्योगपती हर्ष गोयंका यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण रस्त्यावरून जुगाडपासून बनविलेली बाईक आनंदात चालविताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या बाईकवर एक-दोन नव्हे, तर सात जण एकत्र प्रवास करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे ही बाईक पेट्रोल, डिझेल किंवा विजेवर नाही, तर चक्क सोलर पॉवरवर चालते. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती तरुणाला थांबवते आणि विचारते की, त्यानं हे काय बनवलं आहे आणि ते बनवण्यासाठी किती खर्च आला आहे. त्यावर तरुण उत्तर देतो की, ‘मी एक सात सीटर बाईक बनवली आहे; जी सौरऊर्जेवर चालते. जर या बाईकला समान प्रमाणात सूर्यप्रकाश मिळाला, तर ती २०० किलोमीटरहून अधिक प्रवास करू शकते. ही बाईक बनविण्यासाठी ज्या काही गोष्टी वापरल्या त्या सर्व भंगारातून विकत घेतलेल्या आहेत. पण, ही बाईक बनविण्यासाठी आठ ते १० हजार रुपये खर्च आला.
“काकी तर एकदम प्रोफेशनल चोर निघाल्या’; दुकानात आल्या अन् क्षणात पर्स चोरी करुन निघाल्या; पाहा Video
हर्ष गोएंका यांनी व्हिडीओ पोस्ट करीत कॅप्शनमध्ये लिहिले की, टेल्सा खूप गंभीरतेनं भारतात व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशानं पाहत आहे, असं मी ऐकलं. पण, अशी स्पर्धा असेल, तर क्या होगा उनका?
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी त्यावर कमेंट्स करायला सुरुवात केली. एका युजरने लिहिले , “भाई, या व्यक्तीचे टॅलेंट जबरदस्त आहे.” तर दुसऱ्याने लिहिले, “हे तंत्रज्ञान भारताबाहेर जाऊ नये.” दुसऱ्याने लिहिले, “मस्क यांना इलेक्ट्रिक कारचा अभिमान होता. म्हणून आता आम्ही ती तयार केली.”