Desi Jugaad Video : बाईकस्वारांना रस्त्यावरून बाईक चालवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी एखादा कट मारून गेला म्हणून वादाचे प्रसंग, तर कधी अपघाताची भीती. अशा प्रसंगांमुळे बाईकस्वारांना रोज जीव सांभाळून बाईक चालवावी लागते. या बाईकस्वारांसाठी हेल्मेट हे बाईकइतकेच महत्त्वाचे असते; पण ते सांभाळणे फार कंटाळवाणे काम असते. त्यामुळे अनेक जण पार्किंगमध्येच बाईकला हेल्मेट अडकवून जातात; पण ते काही वेळा चोरीला जाते. त्यामुळे हेल्मेट सांभाळायचे कसे, असा प्रश्न बहुतांशी बाईकस्वारांसमोर असतो; पण तुम्ही आता हेल्मेट चोरी होण्याचे टेन्शन सोडा. कारण- एका तरुणाने असा एक भन्नाट जुगाड शोधून काढलाय, ज्यातून तुम्ही बाईक आणि हेल्मेट दोन्ही चोरीला जाण्यापासून वाचवू शकता.

बाईक थांबवल्यानंतर हेल्मेट सतत सगळीकडे घेऊन फिरणे आव्हानात्मक वाटते. त्यामुळे लोक हेल्मेट बाईकलाच लॉक करून ठेवतात. पण, आता एका तरुणाचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात तो बाईकसह तुमचे हेल्मेट कसे सुरक्षितपणे कसे सुरक्षित ठेवू शकता हे सांगतोय. तरुणाची ही ट्रिक लोकांना चांगलीच आवडलीय. त्यामुळे अनेक जण त्याचा व्हिडीओ व्हायरल करीत आहेत.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण हेल्मेट लॉकशिवाय बाईकमध्ये हेल्मेट लॉक करताना दिसतोय. यावेळी तो हेल्मेट बाईक हँडलच्या अगदी कोपऱ्यापर्यंत घेऊन जातो. नंतर तो बाईकचे हँडल लॉक करतो. ज्यामुळे त्याची बाईक आणि हेल्मेट दोन्ही सुरक्षित राहतात. तरुणाचा हेल्मेट सुरक्षित करण्याचा हा भन्नाट जुगाड पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत. त्यामुळे लोक हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

देसी जुगाड व्हायरल व्हि़डीओ (Desi Jugaad Viral Video)

हेल्मेट लॉकचा हा भन्नाट जुगाड urveshkumar011 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत अनेकांनी पाहिला व त्यावर कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिलेय की, आपल्या भारतात खूप हुशार लोक आहेत. दुसऱ्याने लिहिलेय की, जर आपणही हा भन्नाट जुगाड केला, तर हेल्मेट सांभाळण्याची चिंता दूर होईल. तिसऱ्याने लिहिलेय की, हा जुगाड बाईक रायडर्ससाठी खरोखर उपयुक्त आहे.