कारवर डेंट आला असेल तर ही सामान्य गोष्ट आहे. अनेकदा तुमच्या कारवर एखादी कार आदळली तर डेंट येणे साहजिकच आहे. काही वेळा तुमच्याकडून चुकून कार भिंतीला किंवा कशाला तरी जोरात आदळते तेव्हाही कारवर डेंट येतो, पण या डेंट्समुळे कारचा लूक वाईट होतो. अशा वेळी गॅरेजमध्ये जाऊन कारवरील डेंट काढला जातो, पण यासाठी हजारो रुपये तुम्हाला खर्च करावे लागतात. पण एका पठ्ठ्याने कारवरील डेंट काढण्यासाठी असा एक अनोखा जुगाड केला आहे जो पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.
तुम्ही फेसबुक किंवा इन्स्टाग्राम रील्सवर ग्लू स्टिक्सने किंवा गरम पाण्याने कारवरील डेंट काढल्याचे पाहिले असेल. पण ट्विटरवर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती ग्लू स्टिकने कारवरील डेंट काढायला जातो आणि भलतेच होऊन बसते. यात कारवरील डेंट तर जातच नाही, पण गाडीचे खूप नुकसान होऊन बसते. हा व्यक्ती डेंट काढण्यासाठी कारवर ग्लू स्टिक चिकटवतो आणि जोरत खेचतो ज्यामुळे गाडीचा एक पार्ट निखळून हातात येतो.
कारवरील डेंट तर गेला नाहीच, पण झाले हे नुकसान
१७ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती ग्लू स्टिक्सच्या मदतीने कारवरील डेंट काढण्याचा प्रयत्न करत असतो. या वेळी तो ग्लू स्टिक एक एक करून कारवर टेंड असलेल्या जागी चिकटवतो आणि त्यानंतर सर्व ग्लू स्टिक्स एकदा ताकद लावून खेचतो. या वेळी कारवरील डेंट तर निघत नाहीच, पण पूर्ण एक पॅनलच निघून हातात येते. व्यक्तीचा देसी जुगाड पाहून यूजर्सना हसू आवरणे कठीण झाले आहे. कारण व्हिडीओतील व्यक्ती करायला जातो एक आणि त्याच्या हातून भलतेच होऊ बसते.
हा व्हिडीओ @HealDepressions या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्याला आत्तापर्यंत १२.२ हजार लाईक्स आणि १.२ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक यूजर्सनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. यावर एका यूजरने कमेंट करत लिहिले की, या व्हिडीओने तर माझा दिवसाची सुरुवात चांगली केली. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, पूर्ण डेंटच बाहेर निघून आला. अनेकांना हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसू येत आहे. पण तुम्हाला या व्यक्तीने कारवरील डेंट काढण्यासाठी वापरलेला देसी जुगाड कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा.