एक गोष्ट मोठ्या विश्वासाने म्हणता येईल की, जुगाडच्या बाबतीत भारतीयांची बरोबरी कुणीच करू शकणार नाही. कारण, जुगाड करणं हे भारतीयांच्या जणू रक्तातच लिहिलंय. एखाद्या गोष्टीने काम अडत असेल निराश न होता त्यावर पर्याय शोधून काम मार्गी लावण्यात भारतीय खूपच हूशार आहेत. अशा देसी जुगाडचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. सध्या असाच एक देसी जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ देसी जुगाड पाहून बडे बडे इंजिनीअर देखील हैराण झाले आहेत. या देसी जुगाडची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे.

आता मजुरी मिळणं किती कठीण आहे, रेती आणि सिमेंटच्या पोती उचलून आपली उपजिवीका भागवणाऱ्या मजुरांपेक्षा आणखी चांगलं कुणाला माहित? या मजुरांना रेती आणि सिमेंटच्या पोत्या उचलून अनेक मजली इमारतींवर चढावं लागतं, परंतु सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा म्हणाल, “याला म्हणतात स्मार्ट वर्क”. या व्हिडीओमध्ये एका मजुराने इमारतीच्या बांधकामासाठी रेतीने भरलेली पोती इमारतीच्या उंच मजल्यावर पोहोचवण्यासाठी जो देसी जुगाड शोधुन काढलाय ते पाहून तुम्ही हैराण नक्की व्हाल. या मजुरांने वापरलेली ही युक्ती अवलंबली तर मजुरांना होणारा त्रास कमी होईल आणि या अवजड कामात कठोर परिश्रम करावं लागणार नाही.

आणखी वाचा : ‘स्पायडर मॅन’सारखा हा माणूस तीन मजली इमारती सरसर चढतो, VIRAL VIDEO पाहून तुम्हीही थक्क व्हाल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मजूर स्कुटरवर बसलेला दिसून येत आहे. स्कुटर सुरू करताच दुसरीकडे एका दोरीने बांधलेली रेतीची पोती इमारतीच्या उंच मजल्यावर पोहोचते. खरं तर, या मजुराने त्याच्या स्कूटरचे मागचे चाक काढून तिथे मोटार बसवली आहे. त्यामुळे स्कुटर सुरू केली की लगेच मोटारीला दोरीने बांधलेली पोती उंच मजल्यावर पोहोचते. हा देसी जुगाड त्याने कसा केला हे वाचण्यापेक्षा प्रत्यक्षात हे पाहण्यात खरी मजा आहे. हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

आणखी वाचा : पत्नीला बसमध्ये जागा मिळवून देण्यासाठी केला भन्नाट जुगाड, मग काय घडलं, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : कासवाची शिकार करण्यासाठी एक, दोन नव्हे तर चक्क तीन सिंहांनी केला प्रयत्न, पण…

ट्विटरवर pritiesanjay नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये मजुराने शोधलेला देसी जुगाड लोकांना इतका आवडू लागलाय की या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. तर या व्हिडीओला लाईक करत अनेकांनी कमेंट्स सेक्शनमध्ये हा देसी जुगाड शोधणाऱ्या मजुराचं कौतुक केलं आहे.

.या व्हायरल व्हिडीओवरीन लोकांच्या प्रतिक्रिया देखील वाचण्यासारख्या आहेत. एका युजरने असे लिहिले की, ‘देसी जुगाड जिंदाबाद’. दुसर्‍या यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘ज्याने या जुगाडची कल्पना या व्यक्तीला दिली आहे तो खरोखर टॅलेंटेड असेल’. तिसर्‍याने लिहिले की, ‘भारतात कुठेही जुगाड नाही, असं होऊच शकत नाही’, याशिवाय बहुतेक युजर्स इमोटिकॉन शेअर करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.