हिवाळ्यात बर्फासारख्या थंड पाण्यात कपडे धुणे फार कठीण काम असते. कारण या पाण्यात हात खूप सुन्न होतात. त्यामुळे हिवाळ्यात वॉशिंग मशीनचे महत्व वाढते. शिवाय दिवसभर कामात व्यस्त असणाऱ्या महिलाही हल्ली वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुणे पसंत करतात. पण, प्रत्येकालाच वॉशिंग मशीन विकत घेणे परवडत नाही. म्हणून काही लोक जुगाड करून वॉशिंग मशीनला पर्याय निर्माण करतात. अशाच प्रकारे एका व्यक्तीने जुगाड करून एक देशी वॉशिंग मशीन बनवली आहे; ज्यासंबंधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ही वॉशिंग मशीन बनवण्यासाठी पाण्याचा निळा ड्रम आणि एका मोटरचा उपयोग करण्यात आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका पाण्याच्या ड्रमला खाचा करून एक मोटर फिक्स केली आहे. ज्यामुळे वॉशिंग मशीनमध्ये ज्याप्रमाणे कपडे फिरतात, त्याप्रमाणे मोटर ऑन करताच ड्रमातही कपडे फिरू लागतात. याशिवाय ड्रममधील पाणी बाहेर काढण्यासाठी त्याला एक पाईपदेखील जोडला आहे, ज्यामुळे अगदी कमी खर्चात वॉशिंग मशीनप्रमाणेच कपडे धुऊन मिळत आहेत.

हा व्हिडीओ @gamhasahani141 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. यावर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, वॉशिंग मशीन १५० + लिटर्स. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, कोणी म्हणू शकेल का, की भारतात टॅलेंट नाही. तिसऱ्या एका युजरने आनंद घेत लिहिले की, यामध्ये ब्लँकेट व्यवस्थित धुतले जातील. बाय द वे, या जुगाडबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये सांगा.