Desi Jugaad Viral Video : सध्या राज्यातील अनेक भागांत उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. उन्हामुळे दुपारी घराबाहेर पडणंही अवघड होत आहे. तर लहान लहान घरांतही लोकांना दुपारच्या वेळात बसणं कठीणं झालं आहे. सतत वाहणाऱ्या घामाच्या धारांमुळे हैराण झालेले लोक एसी, कूलरचा आसरा घेताना दिसताय. त्यात कुलरमधून थंड हवा येण्यासाठी अनेक जण त्यात बर्फ, पाणी टाकतात; पण हे काम अनेकांना नेहमीच फार कंटाळवाणे वाटतअसते. त्यावर उपाय म्हणून एका तरुणाने भन्नाट जुगाड शोधून काढला आहे आणि त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या जुगाडामुळे कोणत्याही अधिक मेहनतीशिवाय कूलरमध्ये पाणी भरले जातेय.
कमी वस्तूत, कमी खर्चात देसी जुगाड (Desi Jugaad Video Viral)
विषेश म्हणजे तरुणाने अगदी घरातील वस्तू वापरून आणि कमी खर्चात हा जुगाड केला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, कूलर वॉश बेसिनजवळ ठेवला आहे आणि एक बाटली उलट्या बाजूने भोक करून बेसिनमधील नळात अडकवली आहे. नळ सुरू करताच पाणी नळातून बाटलीत आणि बाटलीतून थेट कूलरमध्ये पाणी भरण्यासाठी असलेल्या जागेत जाऊन पडते. त्यामुळे तुमची मेहनत आणि वेळ अशा दोन्ही गोष्टी वाचतायत. अन्यथा, कुलरमध्ये पाणी भरण्यासाठी बादल्या भरून दोन ते तीन वेळा त्यात ओताव्या लागतात. पण या जुगाडामुळे तुमचे ते काम हलके होतं. हा जुगाड जरी छोटा असला तरी अनेकांसाठी खूप फायदेशीर असा आहे.
हा भन्नाट जुगाड व्हिडीओ ‘parasram_todkar1412 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्याचे अनेक जण खूप कौतुक करीत आहेत. दरम्यान, अनेकांनी हा व्हिडीओ पाहून “हा जुगाड भारताबाहेर जाऊ नये” अशी मिश्कील कमेंट केली आहे. तर काहींनी खरंच हा जुगाड खूप फायदेशीर असल्याचे म्हटले आहे. परंतु, हा जुगाड जरी फायदेशीर असला तरी तुम्ही ट्राय करताना कूलर चालू ठेवू नका; अन्यथा विजेचा धक्का लागण्याचा धोका आहे.