हिवाळ्यात अनेकदा स्वेटर, जॅकेट, हुडी आदी अनेक विंटर वेअर बाजारात उपलब्ध असतात. पण, स्वेटर किंवा जॅकेट्स सतत धुतल्यामुळे अनेकदा धागे सुटतात आणि ते सैल होऊन घालण्यायोग्य राहत नाहीत. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एका महिलेने अश्या विंटर वेअर कपड्यांवरील धागे किंवा गोळे काढण्याची एक मजेशीर तसेच उपयोगी पद्धत दाखवली आहे, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
व्हिडीओमध्ये महिला सांगत आहे की, तुम्ही पाच मिनिटांत स्वेटर नवीन बनवू शकता. व्हिडीओमध्ये महिला एक जॅकेट दाखवते, ज्यामध्ये स्वेटरवर गोळे दिसत आहेत. महिलेने हे स्वेटर काही दिवसांपूर्वीच खरेदी केले होते आणि खरेदी केल्यानंतर काही दिवसांतच त्यावर धाग्यांचे गोळे दिसू लागले होते. तर हे पाहून महिला एक जबरदस्त जुगाड करते. महिलेने नक्की काय जुगाड केला, एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.
हेही वाचा…VIDEO: मॅगीप्रेमींसाठी सोशल मीडियावर व्हायरल होतोय ‘हा’ खास केक; एकदा बघाच
व्हिडीओ नक्की बघा :
व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, महिला गाला कंपनीचा एक स्क्रब (Gala Sper Scrub) घेते. तसेच हा स्क्रब स्वेटरच्या गोळे आलेल्या भागावर घासून घेते, ज्यामुळे सर्व गोळे स्क्रबरमध्ये जमा होतात. अशाप्रकारे ती जॅकेटवरील सर्व धाग्यांचे गोळे त्या स्क्रबच्या मदतीने काढून घेते. तसेच जॅकेटच्या फॅब्रिकवर त्याचा परिणाम झाला नाही, असा महिला व्हिडीओत दावासुद्धा करताना दिसते आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @goblet_honey या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून विविध प्रतिक्रिया मांडत महिलेचं कौतुक करताना दिसत आहेत. एका युजरने ‘अनोखी ट्रिक आहे’, तर दुसऱ्या युजरने ‘टेक्निकल गुरुजी’, तर तिसऱ्या युजरने सगळ्यात मौल्यवान लाइफ हॅक. आदी अनेक कमेंट व्हिडीओखाली केलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील.