Desi jugad Viral video: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाने आपला पार चढवायला सुरुवात केली आहे. ऊन आणि गरमीपासून वाचण्यासाठी लोकं बाहेर जाणे टाळून घरीच राहणे पसंत करत आहेत. परंतु महत्त्वाच्या कामासाठी घर सोडावेच लागते. पण असेही काही लोक आहेत जे उन्हापासून वाचण्यासाठी काही ना काही शक्कल लढवतातच. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.भारतीय नागरिक कचऱ्यातून विश्व घडवण्यात चतुर असतात. एखादी वस्तू उपयोगी नाही, असे आपल्या देशात क्वचितच घडते. भारतात जुगाडू लोकांची काहीच कमतरता नाही. भारतीय लोक असे असे जुगाड शोधून काढतात की जे पाहून मोठमोठे इंजिनियर्स आपल्या डिग्र्या फाडतील. सोशल मीडिया विविध व्हिडिओंनी भरलाय. अनेक विनोदी व्हिडिओ आपण इथे रोज पाहत असतो. त्यातले काही व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात. याच प्रकारात येतात जुगाडा व्हिडिओ. स्वत:च डोकं चालवून असं काहीतरी केलं जातं, की मग सोशल मीडियावरचे यूझर्स या जुगाडुंना डोक्यावर घेतात.

देशभरातील तापमान दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. इतक्या गरमीत लोकं घराबाहेर पडताना देखील दहा वेळा विचार करतायेत. पण काही हुशार लोकांनी या गरमीवर मात करण्यासाठी एका पेक्षा एक अतरंगी जुगाड शोधून काढले आहेत. बरं, हे जुगाड कुठल्याही एसी किंवा कूलरपेक्षा कमी नाहीत. तरुणानं टेबल फॅनपासून AC तयार केलाय. आणि हा जुगाड करण्यासाठी तुम्हाला फक्त ५० रुपये खर्च येईल. पण हवा मात्र AC पेक्षाही जास्त थंड येईल. हा जुगाड करून तुम्ही रणरणत्या उन्हातही गुलाबी थंडीची मजा घेऊ शकता.

एकीकडे सध्या हवामानात सतत बदल होत असल्याचं दिसत असलं तरी दुसरीकडे उन्हापासून वाचण्यासाठी लोक एकापेक्षा एक जुगाड करताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर असाच एक हटके व्हिडीओ समोर येत आहे, जो रखरखत्या उन्हात लोकांना मोठा दिलासा देत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणानं या जुगाडासाठी फक्त एक टेबल फॅन, प्लास्टिकची बाटली, प्लास्टिक पाईप आणि बर्फ. या चार वस्तू घेतल्या आहेत. या सगळ्या वस्तू वापरून तो काही क्षणात एसी सारखी हवा येणारा पंखा तयार करतो. तुम्हीही करा हा जुगाड आणि एसी शिवाय खा एसीसारखी थंड हवा.. आता गरमीचं टेन्शनच गेलं.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ muthuranji या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर कमेंट करून लोक मस्करी करत आहेत. एका यूजरने लिहिलं, वाहह एक नंबर, तर आणखी एकानं, हे फक्त भारतीयच करु शकतात असं लिहलं आहे.