Desi jugad Viral video: भारतीय नागरिक कचऱ्यातून विश्व घडवण्यात चतुर असतात. एखादी वस्तू उपयोगी नाही, असे आपल्या देशात क्वचितच घडते. भारतात जुगाडू लोकांची काहीच कमतरता नाही. भारतीय लोक असे काही जुगाड शोधून काढतात की, जे पाहून मोठमोठे इंजिनियर्स आपल्या पदव्या फाडून टाकतील. सोशल मीडिया विविध व्हिडीओंनी भरलाय. अनेक विनोदी व्हिडिओ आपण इथे रोज पाहत असतो. त्यातले काही व्हिडीओ आपल्याला खळखळून हसवतात. याच प्रकारात येतात जुगाडासंबंधीचे व्हिडीओ. स्वत:चे डोके चालवून असे काहीतरी केले जाते, की मग सोशल मीडियावरचे युजर्स या जुगाडूंना डोक्यावर घेतात.

याआधी तुम्ही अनेक वेगवेगळे जुगाड पाहिले असतील; मात्र यापेक्षाही खतरनाक जुगाड समोर आला आहे. एका तरुणाने खराब झालेल्या बाईकला सायकलची चाके लावून नवीन बाईक बनवली आहे. तो या बाईकला पँडल मारत रस्त्यावर मोठ्या आनंदात बाईक चालवत आहे. होय, तुम्हाला विश्वास बसत नाहीये? तर मग व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा पाहाच..हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल..

Shocking Viral Video Scooter rider drag a man for 1 km
बाईकस्वाराने भररस्त्यात ओलांडली क्रूरतेची मर्यादा! वृद्धाला स्कुटीला बांधत फरपटत नेलं अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
Girlfriend write message for boyfriend on 50 Rs Note goes Viral on social media
PHOTO: “तुझा पैसा नको प्रेम हवं, तू बसच्या मागे…” तरुणीनं ५०च्या नोटेवर बॉयफ्रेंडसाठी लिहला खतरनाक मेसेज; वाचून पोट धरुन हसाल
Young Vidarbha boys Cooks Vangi Rassa Bhaji & Bittya on Chulha
विदर्भातील तरुणांनी चुलीवर बनवली झणझणीत वांग्याची रस्सा भाजी अन् खुसखुशीत बिट्ट्या; VIDEO पाहून तोंडाला सुटेल पाणी
Viral videos shocking video of st drivers drove the bus while drunk in badalapur
“अरे अजून किती जीव घेणार?” आणखी एका मद्यधुंद अवस्थेतील एसटी चालकाचा पराक्रम; बदलापूरातील VIDEO पाहून धडकी भरेल
Pune Uncle Wins Hearts After Confronting Unruly Bike Rider with His Bicycle Watch Viral Video
“पुणेकरांच्या नादाला लागू नये!”, बेशिस्त दुचाकी चालकाला सायकल घेऊन भिडले पुणेरी काका, Viral Video बघाच…

जुगाडपासून बनवलेली अनोखी बाइक

जुगाड ही भारतीयांची वेगळी कला आहे. अशातच एका ग्रामीण भागातील व्यक्तीने जुगाडच्या मदतीने एक अनोखी मोटरसायकल बनवली आहे; ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या मोटरसायकलसाठी कोणत्याही प्रकारच्या इंधनाची गरज नाही. ही अनोखी बाईक पाहून तुम्हीही अवाक् व्हाल आणि म्हणाल गावची पोरंच लय भारी.

काय खास आहे व्हिडिओमध्ये

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका तरुणाने एका जुन्या बाईकला पेडल आणि चेन जोडली आहे आणि मोठ्या आनंदाने ती बाईक पेडल मारत तो चालवत आहे. एका तरुणाने भंगारात पडलेल्या एका बाईकचा चांगला उपयोग केला आहे. या व्हिडीओवरून हा ग्रामीण भागातला व्हिडीओ असल्याचे दिसत आहे. याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, लोक त्याचे खूप कौतुक करत आहेत. भारतात जुगाडू लोकांची कमतरता नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> असाही श्रावणबाळ! पांडुरंगाच्या भेटीला आईला खांद्यावर घेऊन निघाला लेक; VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी

@sonufitness53 नावाच्या हॅण्डलने हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक विविध प्रकारच्या कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिले – ७०-८० च्या स्पीडवर ब्रेक कसे लावता? या व्हिडीओला १.५ कोटींहून अधिक व्ह्युज आणि चार लाख २६ हजार लाइक्स मिळाले आहेत.

Story img Loader