लहान मुलांना अनेक कविता शिकवल्या जातात. यातच सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे ‘जॉनी जॉनी येस पापा’ ही कविता. जॉनी जॉनी लहान मुलांची अगदीच आवडती आणि लाडकी इंग्रजी कविता आहे असे म्हणायला हरकत नाही आहे. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण, यात या इंग्रजी कवितेचं देसी व्हर्जन सादर करण्यात आलं आहे ; जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल व्हिडीओत एक व्यक्ती जॉनी जॉनी या कवितेला हिंदी भाषेत शास्त्रीय संगीता सारखं गाताना दिसत आहे. पाच जणांचा ग्रुप ही हटके कविता गाण्याच्या रूपात सादर करताना दिसले आहेत. मधोमध एक व्यक्ती बसली आहे. तिच्या डाव्या बाजूला एक व्यक्ती तबला तर उजव्या बाजूला एक व्यक्ती हार्मोनियम वाजवताना दिसते आहे. तसेच मागे आणखीन दोन व्यक्ती बसल्या आहेत त्या मुख्य व्यक्तीस जॉनी जॉनी ही कविता देसी व्हर्जन मध्ये गाण्यास साथ देताना दिसत आहेत. एकदा तुम्हीसुद्धा बघा हा व्हायरल व्हिडीओ.

Heart-Melting Video
VIDEO : पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं! तरुणाने सादर केली प्रेमावरची कविता; म्हणाला,”एकदा प्रेमात पडल्यावर पुन्हा पडता येत नाही” VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
Vinod Kambli discahrge from hospital
Vinod Kambli video: “तरुणांनो आयुष्य आनंदात घालवा, पण दारू….”, रुग्णालयातून स्वतःच्या पायावर बाहेर आलेल्या विनोद कांबळीचा संदेश

हेही वाचा…VIDEO: दररोज बर्गर खाऊन केला विश्वविक्रम ! ७० वर्षीय व्यक्तीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद…

व्हिडीओ नक्की बघा :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, चार ओळीच्या या कवितेचं शास्त्रीय संगीतद्वारे अवघ्या सहा मिनिटांत रूपांतर केलं आहे. कविता सादर करताना या ग्रुपचा ताल आणि सुर ऐकताना तुम्ही सुद्धा मंत्रमुग्ध व्हाल आणि हा व्हिडीओ पाहत कौतुकाने टाळ्या वाजवाल एवढं नक्की. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Ashok_Kashmir यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

नेटकरी हा व्हिडीओ पाहून या ग्रुपचे कौतुक करताना दिसले आहेत. तसेच अनेक जण गाणं सादर करण्याच्या क्रिएटिव्हिटीला सलाम करत आहेत. तसेच काही जणांना गाणं ऐकून खूप मज्जा आली ; असे ते विविध शब्दात व्हिडीओखाली कमेंटमध्ये सांगताना दिसत आहेत. एकंदरीतच सोशल मीडियावर हे गाणं अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

Story img Loader