Moye Moye desi version: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. दररोज शेकडो हजारो व्हिडीओ यावर अपलोड किंवा शेअर केले जातात. अनेकदा इथे वेगवेगळ्या प्रकारची गाणी आणि डान्सचे व्हिडिओ व्हायरल होतात, त्यानंतर ते ट्रेंड बनतात आणि मग त्यावर व्हिडिओ बनवण्याची प्रक्रिया सुरू होते. सोशल मीडियावर कधी कुठला ट्रेंड येईल, याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडियावर एक वेगळा आणि अजब ट्रेंड आला आहे. सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘मोये मोये’ गाण्याची खूप चर्चा आहे. प्रत्येकजण त्यावर रील बनवण्यात व्यस्त आहे. ‘मोये मोये’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे. अल्पावधीतच हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. आजही या गाण्याची चांगलीच क्रेझ आहे.
‘मोये मोये’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्याचे इंस्टाग्राम रील्स, व्हिडीओ, युट्यूब शॉर्ट्सदेखील बनवले जात आहेत. जगभरातील संगीतप्रेमींच्या हे गाणं पसंतीस उतरलं आहे. लोकप्रिय गायिका आणि गीतकार तेया डोरा यांनी हे गाणं गायलं आहे. आता या गाण्याचे देसी व्हर्जन समोर आले आहे. दोन शीख तरुणांनी या गाण्याचं देसी व्हर्जन तयार केलं आहे. हा व्हिडिओ नेटिझन्सना खूप आवडला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर पुन्हा पुन्हा पाहिला जात आहे.
(हे ही वाचा : काकांनी झटपट श्रीमंत होण्याचा सांगितला अनोखा मार्ग, हरियाणातील व्यक्तीचा पाहा व्हायरल Video )
काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये दोन शीख तरुण दिसत आहेत. हे दोन तरुण एका खोलीत हार्मोनियम घेऊन बसले आहेत. दोघेही पंजाबी भाषेत ‘मोये मोये’ गाण्याचं देसी व्हर्जन गाताना दिसत आहेत. मोये मोये या देसी गाण्यात या तरुणाने हिवाळ्यात आंघोळ न करणाऱ्या आळशी लोकांवर ताशेरे ओढले आहे आणि लोकं हिवाळ्यात एवढे आळशी का होतात, असे आपल्या गाण्यातून म्हणताना दिसतोय.
येथे पाहा व्हिडिओ
या व्हिडिओवर नेटिझन्स जोरदार कमेंट करत आहेत. कमेंटमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. एका तरुणाने सांगितले की, “हे गाणं मूळपेक्षाही चांगलं आहे.” एकाने सांगितले की, “तो तरुण खूप छान गायला आहे.” व्हायरल भयानी यांनी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. काही तासांतच १८ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. यावर १२८ हून अधिक लोकांनी कमेंट केल्या आहेत.