लग्न म्हंटल की, घरात अगदीच उत्साहाचे वातावरण असते. यादरम्यान खरेदी, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच नातेवाईकांना आणि मित्र-मैत्रिणींना लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी लग्न पत्रिका छापली जाते. आता पर्यंत तुम्ही अनेक डिझाईनच्या विविध लग्न पत्रिका पहिल्या असतील. पण, सोशल मीडियावर एक अनोखी लग्न पत्रिका व्हायरल होत आहे ; जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

संजना आणि महजीब असे जोडप्याचे नाव आहे. या जोडप्याची लग्न पत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कारण; ही लग्न पत्रिका अगदीच अनोखी आहे. लग्न पत्रिका सहसा एका विशिष्ठ रंगाची किंवा काही खास डिझाईनने तयार करण्यात येते. पण, व्हायरल होणारी ही लग्न पत्रिका एखाद्या पुस्तकाप्रमाणे आहे. पुस्तकातील एखाद्या धड्याप्रमाणे पांढऱ्या रंगाच्या कागदावर काळ्या मजकुरात लग्न पत्रिका छापण्यात आली आहे. सुरवातीला जोडप्याचे नाव अगदी ठळक अक्षरात लिहिले आहे. त्यानंतर त्यांचा फोन नंबर आणि इमेल सुद्धा लिहिण्यात आला आहे. ही अनोखी लग्न पत्रिका एकदा तुम्हीसुद्धा पोस्टमधून नक्की बघा.

हेही वाचा…१९५० पासून आतापर्यंत गगनाला भिडले सोन्याचे भाव! सोन्याच्या किंमतीमध्ये झालेला बदल पाहून बसेल धक्का, पाहा व्हायरल फोटो

पोस्ट नक्की बघा :

लग्न पत्रिकेत काय आहे खास :

तुम्ही पोस्टमध्ये पाहिलं असेल की, लग्न पत्रिकेत कीवर्ड, प्रस्तावना (introduction), लोकेशन (Location), निष्कर्ष (conclusion), संदर्भ (refrence) हे सर्व लिहिण्यात आले आहे. तसेच लग्न समारंभ कुठे असणार आहे यासाठी एक खास तक्ता सुद्धा तयार केला आहे ; त्यात ठिकाण, वेळ आणि स्थान तक्त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे आणि एक नकाशाचे चित्र सुद्धा यावर चिटकवण्यात आले आहे ; जे पाहून तुम्हाला नवल वाटल्याशिवाय राहणार नाही.

सोशल मीडियावर ही लग्न पत्रिका @rayyanparhlo यांच्या एक्स ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘अजूनही विश्वास बसत नाही की, ही लग्नाची आमंत्रण पत्रिका आहे’ ; असे कॅप्शन या पोस्टला देण्यात आले आहे. तसेच नेटकरी ही लग्न पत्रिका पाहून विविध कमेंट करताना दिसत आहेत. काही जणांना लग्नपत्रिका रिसर्च पेपर सारखी दिसते आहे. तर अनेक जणांना कोर्टाचे कागदपत्र किंवा पुस्तकाच्या पानासारखी ही लग्नपत्रिका दिसते आहे.एकंदरीतच या अनोख्या लग्न पत्रिकेने सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेतले आहे.

Story img Loader