जबलपुरमधल्या अनेकांना ‘देवा मंगोडेवाला’ माहिती आहे. भजीचे हे दुकान तर अनेकांसाठी लँडमार्कच झाले आहे. हा भजीवाला चविष्ट भजींसाठी नाही तर एका वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध आहे. ते कारण म्हणजे असे की या दुकानाचे मालक दैवंद्र जैन उकळत्या तेलातील भजी काढण्यासाठी झा-याच्या नाही तर चक्क हातांचा वापर करायचे. उकळत्या तेलात हात घालून ते भजी तळायचे. त्यांची ही कला आता त्यांच्या मुलानेही आत्मसात केलेली दिसत आहे.
Viral video : मोटारमनच्या प्रसंगावधानाने चर्नी रोड स्टेशनवरचा अपघात टळला
देवेंद्र जैन यांचा मुलगा आनंद जैन हा देखील वडिलांचा व्यवसाय संभाळतो. व्यवसायचे ज्ञान त्यांनी आपल्या वडिलांपासून घेतले पण त्याच बरोबर उकळत्या तेलात हात घालून भजी तळण्याची कला देखील त्याने आत्मसात केली. त्यामुळे अगदी सहज तो उकळत्या तेलाच्या कढईत हात घालून भजी, समोसे तळतो. त्यांच्या या अजब कर्तबगारीमुळे जबलपूरमध्ये आपल्या वडिलांप्रमाणे आनंदही प्रसिद्ध झाले आहे. पूर्वी ही भजी तळण्याची कला पाहण्यासाठी शेकडो लोक त्यांच्या दुकानाबाहेर गर्दी करायचे. गरमागरम भजी खात खात देवेंद्र यांना गरम तेलात हात घालताना पाहण्यात अनेकांचे मनोरंजन व्हायचे आता त्यांची ही कला आनंदनेही आत्मसात केली आहे. अगदी सहजपणे तोही उकळत्या तेलात हात घालतो. उकळत्या तेलाचा एक थेंब जरी अंगावर उडला तरी काय होतं हे वेगळं सांगायला नको पण आनंद यांना मात्र कोणतीही इजा होत नाही. हे दोघंही बाप लेक असा चमत्कार कसा करतात हे मात्र अनेकांसाठी न उलगडलेले कोडेच आहे.