Devar bhabhi Dance video: सध्या सर्वत्र लग्न मोठ्या थाटात होताना दिसत आहे. लग्नातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंद… हाच आनंद साजरा करण्यासाठी लग्न सोहळ्यात मोठ्या उत्साने मंडळी डान्स करतात. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. दिराचं लग्न असलं की वहिनीचा मोठा थाट असतो ही गोष्टी काही सांगायची गरज नाही. कारण ते नातंच तसं असतं. या नात्यात मैत्री, प्रेम आणि आदर असतो. त्यामुळे दिराचं लग्न म्हटलं की वहिनीच्या मनात देखील एक वेगळा उत्साह असतो. याशिवाय लग्नातील अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये वहिनी मोलाचं योगदान देते. तसेच लग्नात डान्स करण्यातही वहिनी पुढेच असते. तर भाऊ मोठा असेल तर त्याच्या बायकोशी लहान दिराचं नातंही तसं खासच असतं, अशाच एका दिराचा आणि वहिनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सध्या लग्नाचा सीजन सुरू आहे. भारतात लग्नात जेवणाबरोबर डीजेवर मनसोक्त डान्स केला जातो. मग लहान मुलं असो वा वयोवृद्ध..संधी मिळताच लोक फ्लोअरवर डान्स सुरू करतात. सोशल मीडियावर लग्नातील एक डान्स व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात दीरानं आपल्या वहिनीसाठी जबरदस्त असा डान्स केला आहे. दोघांच्या डान्स परफॉमन्सने उपस्थितांची मनं जिंकली आहेत.
दीर आणि वहिनीचं नात हे अत्यंत खास असल्याचं म्हटलं जातं. हे नातं म्हणजे आईची माया आणि मित्राप्रमाणे समजून घेणारं असतं. सध्या इन्स्टाग्रामवर अशाच एका दिराचा आणि वहिनीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भारतीय लग्नसमारंभांमध्ये वहिनीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. कारण, त्या लग्नातील इतर काम सांभाळण्यासोबतच आपल्या दिरासोबत लग्नात मस्तीही करतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण स्टेजवर वहिनीसोबत डान्स करत आहे. ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटातील ‘धिक ताना धिक ताना’ या गाण्यावर या दीरानं आपल्या वहिनीसाठी डान्स केला. तुम रंग रुप मे अपणी परछाई लाना असं तो सांगत आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ sharvari_mardhekar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.