Funny gifts for wedding: लग्न म्हटलं की आहेर आलाच.. तुमची उपस्थिती हाच आहेर.. असं पत्रिकेत कितीही मोठ्या अक्षरात छापलं तरी लग्नात हमखास आहेर, गिफ्ट्स दिले जातात आणि घेतलेही जातात, हा अनुभव आजवर अनेक जणांनी घेतला असणारचं. आता लग्नातला आहेर म्हणजे एखादी भारीची वस्तू, कपडेलत्ते, घरात लागणारे सामान किंवा अगदी सोन्याचांदीच्या वस्तूही दिल्या जातात. फुलं आणि रोख रकमेच्या स्वरुपात दिला जाणारा आहेरही समजण्यासारखा आहे. मात्र एका लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला असे गिफ्ट्स दिले आहेत जे पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्टेजवर नवरा नवरी उभे आहेत. यावेळी नवरदेवाचे एक एक मित्र येतात आणी नवरीला गिफ्ट्स म्हणून एक एक वस्तू देतात. काहींनी वधूला लाटणं दिलं, तर काहींनी टॉयलेट क्लिनिंग ब्रश दिला. एका व्यक्तीने एक बादलीही भेट दिली. अशा भेटवस्तू पाहून वधूला हसू आवरता आले नाही. भेटवस्तू देण्याचा व्हिडीओ स्टेजवर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने रेकॉर्ड केला आणि शेअर केला, त्यानंतर तो व्हायरल झाला आहे. शेवटी मात्र नवरदेवानं त्यातील एका मित्रावर मस्ती मस्तीमध्ये हात उचलला.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – लेकरु १६ दिवस होतं कोमात, अचानक ‘आई’ हाक मारली अन्,..माय-लेकाचा हृदयस्पर्शी Video व्हायरल
सध्या हा व्हिडियो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून व्हिडियो पाहणारा प्रत्येक जण हे अजब प्रकारचं गिफ्ट पाहून हैराण झाला आहे.