लग्नानंतर जेव्हा नवरी पहिल्यांदा सासरी येते तेव्हा केवळ कुटुंबीयच नाही तर आसपासचे लोकही तिच्या स्वागतासाठी हजर राहतात. नवरी ही घरात आलेली लक्ष्मी असते असं म्हटलं जातं. कारण तिच्या येण्यानं घरातील लोकांचा आनंद आणखीच वाढतो. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका नव्या नवरीला दिराने काढीनं बदडून फटके देत विचित्र स्वागत केलंय. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण हैराण होतोय.
दिर-वहिनीचं नातं जे इतर नात्यांपेक्षा खूप वेगळं असतं. या नात्याला शब्दा मांडणं अशक्यच. सासरी नववधूला नवऱ्यानंतर सर्वात जवळ कोणी असेल तर तो म्हणजे दिरच. दिर तिचा भाऊ असतो अशाच एका दिराने लग्न करून घरी आल्या आल्याच काठीने बदडायला सुरूवात केली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दीर आणि वहिनी एकमेकांना कडुलिंबाच्या फांदीने लाक्षणिकरित्या मारताना दिसत आहेत. सुरुवातीला, सर्वकाही सामान्य आणि विधी वाटते, परंतु काही सेकंदांनंतर हे स्पष्ट होते की दिराच्या कृतीतून तो खरोखरच वहिनीला मारत आहे. हळू हळू काठी मारत असताना अचानक तो आपल्या पूर्ण मेहनतीने आपल्या नव्या नवरीला मारू लागतो, तेव्हा तिथे उभे असलेले लोक पाहतच उभे असतात.
सोशल मीडियावर व्हायर होत असलेला पाहून सुरूवातीला तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. हे नक्की चाललंय काय, असा विचार तुमच्या मनात आलाच असेल. अनेक ठिकाणी लग्नानंतर हा खेळ खेळला जातो. या परंपरेनुसार, जेव्हा नवी नवरी पहिल्यांदा आपल्या सासरी येते तेव्हा तेव्हा नवरी असलेल्या वहिनी आणि दिराला काठीनं एकमेकांची धुलाई करावी लागते. मात्र, मस्करीत अनेकदा लोक एकमेकांना जोरजोरातही मारू लागतात. असंच काहीसं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं. यात दिसतं, की लग्नानंतर सासरी पोहोचलेली नवरीबाई परंपरेनुसार दिरासोबत हा खेळ खेळत आहे. मस्करीत हा दीर आपल्या वहिनीला जोरजोरात मारू लागतो. इतक्यात शेजारी उभा असलेली नवरदेवाची आई त्याला थांबवते.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पानीपतमधला आहे. या व्हिडीओमधल्या वहिनी आणि दीरांचं अनोखं नातं सर्वांचंच मन जिंकून घेत आहे. हा दीर आणि वहिनीचा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.