DCM Devendra Fadnavis Fact Check Video : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते व वांद्रे पश्चिमचे तीन वेळा माजी आमदार असलेले बाबा सिद्दीकी यांची शनिवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. लॉरेन्स बिश्नोई टोळीने नंतर त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. या हत्येनंतर मुंबईत लावण्यात आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पोस्टर्सचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. या पोस्टर्सवर ‘बदला पुरा!’ (बदला पूर्ण) असे लिहिले आहे. ही पोस्टर्स आता सोशल मीडियावर व्हायरल करीत असा दावा केला जात आहे की, बाबा सिद्दीकींच्या मृत्यूनंतर मुंबईत हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. पण, खरंच अशा प्रकारे बॅनर्स मुंबईत कुठे झळकले का, याबाबतचे सत्य जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. तेव्हा एक वेगळंच सत्य समोर आलं, ते नेमकं काय आहे जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर व आप नेते नरेश बल्यान यांनी त्यांच्या हॅण्डलवर हे फोटो शेअर केले आहेत.

Mumbai crime news
मुंबईत ९ वर्षांत १९ गोळीबाराच्या घटना
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : “…कारण महापुरुष कधीच मरत नाहीत”, रतन टाटांच्या निधनानंतर आनंद महिंद्रांची पोस्ट
Lalu Prasad Yadav and Tejswi Yadav
लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या मुलांना दिलासा; ‘Land For Jobs’ घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर!
Sachin Tendulkar and his family at Union Minister Nitin Gadkari Nagpur residence
तेंडुलकर कुटुंबासह पोहोचला गडकरींच्या घरी…गडकरींनी दिला एकच सल्ला…
Hindenburg on Madhabi Puri Buch
‘सेबी’च्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांना संसदेच्या लोकलेखा समितीचे समन्स; हिंडेनबर्गच्या आरोपांची चौकशी होणार?
Delhi CM Aatishi
कोविड योद्धांच्या कुटुंबियांना मिळणार एक कोटी रुपये, दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Ruta Awhad Sparks Controversy osama bin laden apj abdul kalam
Video: “ओसामा बिन लादेन दहशतवादी म्हणून जन्मला नाही, त्याला समाजानं…”, जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीकडून अब्दुल कलाम आणि लादेन यांची तुलना

इतर युजर्सदेखील त्याच दाव्यासह फोटो शेअर करीत आहेत.

तपास :

दाव्यासह शेअर करण्यात आलेल्या फोटोंवर आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे तपास सुरू केला.

यावेळी आम्हाला हिंदुस्तान टाइम्समध्ये २६ सप्टेंबर रोजी प्रकाशित झालेले एक वृत्त सापडले; जे नेता बाबा सिद्दीकीला गोळ्या घालून हत्या करण्याच्या आधीचे आहे.

https://www.hindustantimes.com/cities/mumbai-news/badla-pura-bjp-tries-to-one-up-shiv-sena-in-taking-credit-for-badlapur-accused-s-encounter- 101727292321634.html

बातमीत असे म्हटले आहे की, शिवसेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील अटक करण्यात आलेला आरोपी अक्षयचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाल्याने आनंद साजरा केला. कार्यकर्त्यांनी याचे सर्व श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देत फटाके फोडून, मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपाही आपल्या मित्रपक्षाला टक्कर देण्याचा प्रयत्न करताना दिसला.

ही पोस्टर्स बदलापूर चकमकीनंतर लावण्यात आले होते.

इस्रायल हादरलं! इराणच्या हल्ल्यात गॅस स्टेशनवर झाला मोठा स्फोट? सर्वदूर आगीच्या ज्वाळा; Video खरा, पण नेमका कुठला; वाचा सत्य

आम्हाला त्याच घटनेबद्दल इतर मीडिया वेबसाइटवरदेखील बातम्या सापडल्या.

https://www.indiatvnews.com/maharashtra/devendra-fadnavis-posters-surface-in-mumbai-after-badlapur-encounter-bjp-shiv-sena-ncp-photos-videos-latest-updates-2024-09- २५-९५३८७४

https://www.tv9hindi.com/state/maharashtra/badla-pura-posters-in-mumbai-devendra-fadnavis-badlapur-encounter-bjp-maharashtra-poltics-2848964.html

निष्कर्ष :

बदलापूर चकमकीनंतर मुंबईत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टर्सचे फोटो आता राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या केल्यानंतर पुन्हा शेअर केले जात आहेत. त्यामुळे व्हायरल होणारे दावे खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत.