विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये प्रचारसभेसाठी फिरत असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरची चाके मातीत रुतल्याची घटना पेणमध्ये घडली. या घटनेमुळे काही काळ गोंधळ उडाला. मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या अधिकारी या अपघातातून सुखरुप बचावले. मात्र या घटनेचे पडसाद इंटरनेटवरही उमटले. मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरला लिंबू मिरची न बांधल्याने त्यांचे चाक मातीत रुतल्याची टोला अनेकांनी लगावला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर फ्रान्सकडून भारता मिळालेले पहिले राफेल विमान ताब्यात घेतल्यानंतर त्या विमानाच्या चाकांखाली ठेवण्यात आलेल्या लिंबूवरुन बराच वाद झाला. याच पार्श्वभूमीवर नेटकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसंदर्भातील गोंधळाला लिंबू मिरचीची ‘फोडणी’ दिली आहे.
नक्की काय घडले
मुख्यमंत्री प्रचारसभेसाठी पेणमध्ये आले होते. त्यांच्या हेलिकॉप्टरसाठी बोरगाव येथे हेलीपॅड तयार करण्यता आले होते. दुपारी सव्वा चारच्या सुमारास मुख्यमंत्र्याचे हेलिकॉप्टर उतरले. मात्र त्याची चाके मातीत रुतली. रायगड जिल्ह्यात दिन दिवसांपासून वादळी पाऊस सुरु होता. जमिनितील ओलाव्यामुळे हेलिकॉप्टरची चाके रुतली. मुख्यमंत्री पेण येथील सभा आटोपून त्याच हेलिकॉप्टरने उल्हासनगरकडे रवाना झाले होते.
नेटकरी काय म्हणाले…
अरे कुणीतरी
सि. एम. च्या हेलिकॉप्टर ला पण #लिंबू_मिरची लावा रे.
(ते आज पण गळपटलं)
आजही पडता पडता वाचले. https://t.co/KBFguQMxT7— Nitin Kandharkar (@imNRK17) October 11, 2019
नाही फडणविस साहेबांना लिंबू मिर्ची बांधली नव्हती
— अनिकेत कुकाले (@aniket_kukale) October 11, 2019
एक #राफेल कमी आणा.
पण आमच्या हेलिकॉप्टर ला #लिंबू_मिरची बांधा…
फडणविस.
— Salman Khan (@BeingSalman2802) October 11, 2019
हेलिकॉप्टरला ‘लिंबू-मिरची’ बांधावी लागतेय बहुतेक..
— Shakti Shinde (@ShakteeArt) October 11, 2019
#कामगार_निधी कमी पडलीय का???#हेलिकॉप्टर ला लिंबू मिरची लावताना टाळाटाळ का करताय??
— Prathviraj Patil (@PrathviPatil) October 11, 2019
अरे त्या हेलिकॅप्टर ला लिंबू मिरची बांधा रे कुणीतरी @ameytirodkar @Advait_Mehta https://t.co/biyp263Mso
— Somnath Adhav سومناتھ (@AAsksom05) October 11, 2019
मुख्यमंत्र्यांनी आता तरी हेलिकॅप्टरला लिंबू अन मिरची बांधावी.#म#मराठी
— Shekhar Bansode (@ShKhaAr) October 11, 2019
हेलिकॉप्टर ला लिंबू -मिर्ची लावेल नसेल कदाचित.।
— Ganesh pawar patil (@Ganeshpawarpat4) October 11, 2019
लिंबू
मिरची
नारळविसरलात का इतक्यात? https://t.co/ZHLvZuxeHQ
— Pratapsinh Patil (@gpekmaratha) October 11, 2019
हेलिकॉप्टरला लिंबू मिरची न बांधल्याचा फटका बसला असावा वाटत….असो या पुढे मुख्यमंत्र्यांनी राजनाथसिंह यांनी #राफेल_पूजन केले त्याप्रमाणे प्रवासाला निघायच्या आधी लिंबू मिरची बांधून स्वस्तिक आणि ओम काढून वाहन तयार ठेवायला वाहनचालकाला सांगावे.
— Rajesh Kadam (@RajKspeaks) October 11, 2019
कदाचित लिंबू मिरची बांधली नसावी घेताना
— अMIत (@Amit53795034) October 11, 2019
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरच्या बाबतीत कोणताही अनुचित प्रकार झालेला नाही. त्यामुळे अफवांवर व चुकीच्या माहितीवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले आहे.