विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये प्रचारसभेसाठी फिरत असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरची चाके मातीत रुतल्याची घटना पेणमध्ये घडली. या घटनेमुळे काही काळ गोंधळ उडाला. मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या अधिकारी या अपघातातून सुखरुप बचावले. मात्र या घटनेचे पडसाद इंटरनेटवरही उमटले. मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरला लिंबू मिरची न बांधल्याने त्यांचे चाक मातीत रुतल्याची टोला अनेकांनी लगावला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर फ्रान्सकडून भारता मिळालेले पहिले राफेल विमान ताब्यात घेतल्यानंतर त्या विमानाच्या चाकांखाली ठेवण्यात आलेल्या लिंबूवरुन बराच वाद झाला. याच पार्श्वभूमीवर नेटकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसंदर्भातील गोंधळाला लिंबू मिरचीची ‘फोडणी’ दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की काय घडले

मुख्यमंत्री प्रचारसभेसाठी पेणमध्ये आले होते. त्यांच्या हेलिकॉप्टरसाठी बोरगाव येथे हेलीपॅड तयार करण्यता आले होते. दुपारी सव्वा चारच्या सुमारास मुख्यमंत्र्याचे हेलिकॉप्टर उतरले. मात्र त्याची चाके मातीत रुतली. रायगड जिल्ह्यात दिन दिवसांपासून वादळी पाऊस सुरु होता. जमिनितील ओलाव्यामुळे हेलिकॉप्टरची चाके रुतली. मुख्यमंत्री पेण येथील सभा आटोपून त्याच हेलिकॉप्टरने उल्हासनगरकडे रवाना झाले होते.

नेटकरी काय म्हणाले…

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरच्या बाबतीत कोणताही अनुचित प्रकार झालेला नाही. त्यामुळे अफवांवर व चुकीच्या माहितीवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले आहे.