Devendra Fadnavis Singing Neele Neele Ambar par: देवेंद्र फडणवीसांनी आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात गायलेल्या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. किशोर कुमार यांचं ‘नीले नीले अंबर पर’ हे गाणं गाताना फडणवीस अगदी गमतीच्या मूड मध्ये दिसत होते. उपस्थितांसह टाळ्या वाजवत, उत्साहात फडणवीस गाणं गात होते. अमृता फडणवीस म्हणजेच उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीला गाण्याची आवड असल्याने अनेकांनी कमेंट्समध्ये त्यांचाही उल्लेख केला आहे. फडणवीसांचा हा अंदाज अनेकांना आवडलाय तर काहींनी मात्र यावर टीका सुद्धा केली आहे.
Video: देवेंद्र फडणवीस जेव्हा नीले नीले अंबर पर गातात..
यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात सुद्धा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रिय सामी- सामी गाणं गायलं होतं, एका व्हायरल व्हिडीओमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे श्रीवल्ली हे गाणं गातान दिसले होते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सुद्धा चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच गाण्याचे मूळ गायल जावेद अलीसुद्धा दिसत होते. एका खासगी पार्टीत जावेद अली हे गाणं गात असताना तिथे उपस्थित असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले आणि त्यांच्यासमोर त्यांनी माइक धरला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्याबरोबर साथ देत ‘श्रीवल्ली’ गण्याचं कडवं गायलं.
दरम्यान विधानसभा व विधानपरिषदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. नागपुरात सुरु असलेल्या अधिवेशनात मराठा आरक्षण, अवकाळीची नुकसान भरपाई, बेरोजगारी, राज्याचा आर्थिक विकास अशा विविध मुद्द्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात आतापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर भाष्य केलं आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणापासून ते ऑनलाईन बेटिंग प्लॅटफॉर्म्सपर्यंत विविध विषयावर फडणवीसांनी सरकारची भूमिका मांडली आहे.
हे ही वाचा<< लोकसभेतील घुसखोरांना ‘या’ भाजप खासदारानी दिला होता प्रवेशाचा पास; १३ डिसेंबरला पंतप्रधान मोदी कुठे होते?
दुसरीकडे, अधिवेशनात काल सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदारांचे फोटोसेशन पार पडले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात झालेले हास्यविनोद सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.