Weird Devil Lemon Video: सोशल मीडिया हा खरोखरच जगाला जवळ आणणारा दुवा ठरत आहे. अगदी लोकांच्या स्वयंपाक घरात काय चालूये याची सुद्धा माहिती आपल्याला या ऑनलाईन माध्यमांमधून मिळत असते. किचन मधील अनेक प्रयोग हे सर्वांनाच थक्क करत असतात. कधी एखादी रेसिपी तर कधी रेसिपी साठी वापरलेल्या वस्तू, भाज्या व अन्य साहित्य.. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत पाहताना अनेकदा टिप्स मिळत असतात. विशेषतः भारतात बसून जर तुम्ही परदेशातील जेवण बनवायचे चॅनल्स किंवा पेजेस पाहत असाल तर तुम्हाला कधी ना कधी हा प्रश्न पडलाच असेल की, “अरे त्यांच्याकडच्या भाज्या एवढ्या मोठ्या कशा” म्हणजे आपल्याकडचे चार लहान कांदे मिळून यांच्याकडे एक बनतो की काय, सिमला मिरची किंवा रसाळ टोमॅटोबद्दल तर विषयच काढायला नको. पण आज जो व्हिडीओ चर्चेत आलाय त्याने तर नेटकऱ्यांना पार आश्चर्याचा धक्काच दिला आहे. यामध्ये एका महिलेने आपल्या बागेत लिंबाच्या झाडाला उगवलेले भन्नाट फळ दाखवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॅक्सिन शार्फ (@maxiskitchen) च्या इंस्टाग्राम रीलमध्ये, तिने आपल्या घरातील बागेत लिंबाच्या झाडावर उगवलेला मोठा लिंबू दाखवला आहे. या लिंबाचा आकार कापण्याआधीच इतका विचित्र आणि मोठा असतो की तिथेच आधी आपण बुचकळ्यात पडतो. पण जेव्हा मॅक्सिन हा लिंबू कापते तेव्हा आतमध्ये अनेक लिंबाचे छोटे- छोटे काप एकत्र जोडल्यासारखे दिसतात. स्वतः ही क्रिएटर सुद्धा हा भलामोठा लिंबू पाहिल्यावर थक्क झाली होती आणि तिचे हे आश्चर्य काहीच खोटे नाही कारण यापूर्वी अशाप्रकारचा लिंबू कदाचितच कोणी पाहिला असेल.

Video: विचित्र लिंबाला कापताच जे दिसलं..

हे ही वाचा<< Video: अर्धा कप मूगडाळीने बनवा चटपटीत ‘राम लड्डू’, चटणीमध्ये वापरा ‘हे’ सिक्रेट, एकदा करून पाहाच

२५ मिलियनहुन अधिक व्ह्यूज असलेला हा व्हिडीओ पाहून काहींनी मात्र आपल्याला थोडी किळस व अस्वस्थता जाणवली अशी ही तक्रार केली होती. तुम्ही ‘ट्रायपोफोबिया’ साठी आधी वॉर्निंग तरी द्यायला हवी होती अशीही कमेंट यावर वारंवार दिसून येते. ट्रायपोफोबिया हा इंटरनेटवरील सर्वाधिक चर्चेत असलेल्या फोबियांपैकी एक आहे पण आश्चर्य म्हणजे नेमका याचा अर्थ काय आणि तुम्हाला याचा त्रास आहे की नाही हे कसे ओळखायचं हे अनेकांना माहित नसतं. ट्रायपो + फोबिया हे दोन शब्द जोडून हा शब्द तयार होतो. यातील ट्रायपोचा अर्थ होतो लहान छिद्र आणि फोबिया म्हणजे भीती. यानुसार ट्रायपोफोबिया म्हणजे लहान छिद्रांची भीती.काहींनी तर या वाकड्या तिकड्या लिंबाला राक्षसी फळ सुद्धा म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devil lemon cut with tons of lemons inside 25 million people got scared looking at weird fruit grown in tree watch video svs
Show comments