सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ राजस्थानमधील अजमेरचा आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील दोन सूना भांडताना दिसत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या दोघी सूना करोडपती कुटूंबातील असून नात्यात त्या जावा-जावा असल्याचे दिसते. या दोघी भांडणात इतकं त्यांचं भान हरपून जातं की ते शेवटी शेवटी भांडता भांडता जवळच्या नाल्यातच पडतात. नाल्यात पडल्यानंतरही या दोघींना भांडण मात्र सुरूच ठेवलं. हा मजेदार व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरून हसाल, हे मात्र नक्की.
राजस्थानच्या बेवारस शहरातील टाटगड रोडवर असलेल्या नायरा पेट्रोल पंपावर बुधवारी सायंकाळी उशिरा मालमत्तेवरून दोन पक्षात वाद सुरू होता. यावेळी दोन्ही सूना एकमेकांना भिडल्या. या दोन्ही सूनांमधलं भांडण इतकं पेटलं की दोघींपैकी एक ही शांत होण्याचं नाव काही घेत नव्हत्या. कुटुंबातील इतर सदस्यांनीही यात मध्यस्थी घेतली. इतकंच काय तर तमाशा पाहत उभे असलेल्या लोकांनीही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. पण आजूबाजूच्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून दोन्ही सूना एकमेकांना शिवीगाळ आणि मारहाण करत राहिल्या. या भांडणात दोघींचं इतकं भान हरपल्या होत्या की बाजुला एक नाला आहे हे देखील त्यांच्या लक्षात आलं नाही. शेवटी भांडता भांडता त्या दोघीही नाल्यात पडल्याच. नाल्यात पडल्यानंतर तरी त्या दोघी शांत झाल्या असतील, असं तुम्हाला वाटत असेल, तर थोडं थांबा. नाल्यात इतकी घाण आणि दुर्गंधी असूनही त्या दोघींनी काही भांडण सोडलं नाही आणि पुन्हा नाल्यातच एकमेकांसोबत भिडल्या.
नाल्यात पडल्यानंतर त्या दोघी एकमेकींच्या झिंज्या उपटत ठोश्या-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. रागाच्या भरात त्यांनी एकमेकांचा गळा आवळून तोंडावर ओरखडे काढले. यादरम्यान एका बाजूने एका तरुणानेही नाल्यात उडी घेऊन एकीला मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून मग दुसऱ्या गटातला सुद्धा एक जण नाल्यात उतरला आणि त्याने दुसरीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे तिसरी आणि चौथी महिलाही या लढतीत सामील झाली. शेवटी लोकांनी यात मध्यस्थी घेऊन हा वाद शांत केला.
आणखी वाचा : त्सुनामी सारखे ढग तुम्ही कधी पाहिलेत का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी संपूर्ण प्रकरण शांत केले. सिटी कोतवाल सुरेंद्रसिंह जोधा यांनी सांगितले की, दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून मिळालेल्या फुटेजच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.
आणखी वाचा : हैदराबादच्या रस्त्यावर ५००-५०० रूपयांच्या नोटांचा पाऊस, VIRAL VIDEO वर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा महापूर
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : रस्त्यावर कॉटन कँडी विकणारा माणूस भावूक झाला, हा VIRAL VIDEO पाहून तुम्हालाही रडू येईल
या दोन्ही सूना कोट्यावधींचा व्यवसाय करणाऱ्या कुमावत या श्रीमंत घराण्यातल्या आहेत, हे कळल्यानंतर मोठा धक्का बसतो. नायरा पेट्रोल पंपाचे मालक नरेंद्र कुमार आर्य आणि त्यांच्या कुटुंबातील एक विधवा संगीता कुमावत यांच्यात मालमत्तेवरून हा वाद सुरू होता. मारहाणीत दोन्ही गटांमधले लोक जखमी झाले आहेत.