Dhananjay Powar Bigg Boss Marathi Season 5 : कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणून धनंजय पोवारने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली होती. धनंजयचा खेळ हा सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र अवघ्या काही पावलांवर त्याचं ट्रॉफीचं स्वप्न अर्धवट राहिलं आहे. धनंजय हा टॉप ६ मध्ये जाणारा तिसरा स्पर्धक होता. तसेच धनंजयच ही ट्रॉफी उचलणार अशी जोरदार चर्चाही सोशल मीडियावर होती. विनोदी शैलीमुळे बिग बॉसच्या घरातलं धनंजय वातावरण अगदी हलकं केलं होतं. त्याचप्रमाण टास्कही तो तितक्याच जिद्दीने खेळला असल्याचंही पाहायला मिळालंय. अशातच या रांगड्या गड्याचं कोल्हापूरात जोरदार स्वागत होणार आहे. धनंजय पोवारच्या स्वागतासाठी कोल्हापूरकरांनी जंगी तयारी केली आहे, याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
कोल्हापूर म्हटलं की, डोळ्यासमोर येतात रांगडी अन् मनमौजी लोकं. आपल्या दिलखुसलास वागण्यासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूरकर कायमच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात. अशातच आता धनंजय पोवारमुळे कोल्हापूरचं नाव सध्या ट्रेंडींगवर आहे. यावेळी कोल्हापूरकरांनी धनंजय पोवारच्या स्वागतासाठी जबरदस्त असं नियोजन केलं आहे. कोल्हापूरातील शिवतिर्थ इचलकरंजीमधून धनंजय पोवारची विजयी मिरवणूक निघणार आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, यावेळी मोठा डिजे आणि साऊंड सिस्टिमचा बेस याठिकाणी चाहत्यांनी आणला आहे. हा साधासूधा साऊंड सेटअप नसून खास बिगबॉसच्या पॅटर्नमधला हा सेटअप सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. यावर बिगॉबसचा एक मोठा डोळा आणि बाजूला धनंजय पोवारचे फोटो लावण्यात आले आहेत. त्यामुळे धनंजय पोवारची भव्यदिव्य अशी ही मिरवणूक निघणार आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> सूरज चव्हाणच्या आगमनाला गावात खतरनाक नियोजन; २०० किलोचा हार १२ डिजे अन्..सुरजच्या घराबाहेरचा VIDEO व्हायरल
कोण आहे धनंजय पोवार?
सोशल मीडियाच्या माध्यमातून धनंजयला प्रसिद्धी मिळाली. बायको आणि आईसोबतचे त्याचे रिल्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्याचमुळे धनंजयला बिग बॉसच्या घरात एन्ट्री मिळाली. तसेच धनंजय एक व्यावसायिक देखील आहे. कोल्हापूरमध्ये धनंजयचा फर्निचरचा व्यवसाय आहे. सोसायटी फर्निचर या नावाने कोल्हापूरमध्ये भव्य असं फर्निचरचे शोरूम आहे. आपल्या विनोदी शैलीमुळे धनंजयला सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे त्याचा एक मोठा चाहतावर्ग तयार झाला.
soundcity_ichalkaranji नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “हे कोल्हापूर हाय भावा इथं प्रत्येक विषय हार्डच असतो” “कोल्हापूरचा वाघ” अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.