Dharavi Arvind Vaishya Murder Case : दोन गटांमधील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या धारावीतील २६ वर्षीय तरुणाची नुकतीच निर्घृण हत्या झाली. बजरंग दल कार्यकर्ता असलेल्या या पीडित तरुणाचे नाव अरविंद वैश्य, असे आहे. धक्कादायक बाब म्हणजे अरविंद याच्या अंत्ययात्रेवरही दगडफेकीची घटना घडली होती. या घटनेनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. व्हिडीओमध्ये मराठी आणि इंग्रजीमधून दावा केला जात आहे की, अरविंद वैश्य यांची निर्घृण हत्या कशा प्रकारे करण्यात आली त्या वेळचे हे दृश्य आहे. पण, खरंच हा व्हिडीओ अरविंद वैश्य यांच्या हत्येचा आहे का याचा आम्ही शोध घेतला असता, एक वेगळीच बाजू समोर आली आहे. त्यामुळे या व्हिडीओबाबत व्हायरल होणारे दावे खरे की खोटे हे जाणून घेऊया…

काय होत आहे व्हायरल? (Dharvi Murder Case)

(दृश्य विचलित करणारे असू शकतात.)

vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
suniel shetty injured on hunter movie set
अभिनेता सुनील शेट्टीचा सेटवर झाला अपघात, स्वतःच अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाला जखमी
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
Vijay Deverakonda fell down the stairs video goes viral on social media
Video: जिना उतरताना जोरात पडला विजय देवरकोंडा, व्हिडीओ होतोय व्हायरल

X यूजर UPE0449 ने व्हिडीओ आपल्या प्रोफाईलवर शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हिडिओ शेअर करत आहेत.

dharavi murder case
धारावी मर्डर केस
dharavi murder case
धारावी मर्डर केस

तपास:

आम्ही व्हिडिओवरून मिळालेल्या कीफ्रेमवर गूगल रिव्हर्स इमेज सर्च चालवून तपास सुरू केला.

आम्हाला काही बातम्यांच्या रिपोर्ट्समध्ये व्हायरल व्हिडिओमधले स्क्रीनग्रॅब्स आढळले.

https://www.thehansindia.com/andhra-pradesh/man-brutally-murdered-in-vinukonda-of-palnadu-district-section-144-imposed-892763

रिपोर्टमध्ये म्हंटले होते: ए पालनाडू जिल्ह्यातील विनुकोंडा येथे एका व्यक्तीच्या निर्घृण हत्येने तेथील स्थानिक रहिवाशांमध्ये खळबळ उडाली. रात्री मुख्य रस्त्यावर एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. व्यक्तीवर प्रथम क्रूर हल्ला करण्यात आला, यानंतर रुग्णालयात दाखल केले असता उपचार घेत असताना तिचा मृत्यू झाला. मुंडलामुरू बसस्थानकावर ही घटना उघडकीस आली, जिथे एका व्यक्तीने भर लोकांसमोर दुसऱ्या व्यक्तीवर हल्ला केला. स्थानिक रहिवाशांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली, त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून या घृणास्पद गुन्ह्यासाठी जबाबदार असलेल्या गुन्हेगाराला पकडले.

आम्हाला १८ जुलै २०२४ रोजी अपलोड केलेली द हिंदू वर एक बातमी सापडली.

https://www.thehindu.com/news/national/andhra-pradesh/man-brutally-hacked-to-death-andhra-pradeshs-vinukonda-incident-caught-on-camera/article68416670.ece

इतर अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे की, पीडित महिला YSRC पक्षाची सदस्य होती, तर आरोपीचे नाव शेख जिलानी असे आहे, जो सत्ताधारी TDP चा कार्यकर्ता होता.

https://timesofindia.indiatimes.com/city/vijayawada/ysrcp-worker-hacked-to-death-in-andhra-pradesh/articleshow/111825185.cms

आम्हाला घटनेचे व्हिडिओ रिपोर्ट्स देखील सापडले.

मुंबई पोलिसांनी एक्स वर केलेली एक पोस्ट सापडली.

https://x.com/MumbaiPolice/status/1818327654338326875

पोस्टमध्ये नमूद केले आहे की, व्हायरल व्हिडिओ मुंबई किंवा मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील नाही.

निष्कर्ष:

व्हायरल व्हिडिओ आंध्र प्रदेशातील पालनाडू जिल्ह्यातील विनुकोंडा शहरात रस्त्यावर एका व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा आहे. त्यामुळे मुंबईतील धारावीतील बजरंग दलाचा कार्यकर्ता अरविंद वैश्यच्या हत्येचा आणि या व्हिडीओचा काहीही संबंध नाही, हा व्हिडीओ अरविंद वैश्यच्या हत्येचा नाही. त्यामुळे व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.