भारताला विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने एका पाकिस्तानी गोलंदाजाला एक खास भेट दिली आहे. धोनीने आपली चेन्नई सुपर किंग्जची जर्सी पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज हारिस राउफला (Haris Rauf) भेट दिली आहे. ही भेट मिळताच या पाकिस्तानी गोलंदाजाने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे.

लिहिली खास पोस्ट

राउफने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले आणि लिहिले, “लेजेंड आणि कॅप्टन कूल धोनीने मला ही सुंदर भेट देऊन सन्मानित केले. सातवा क्रमांक आजही आपल्या वागण्याने लोकांची मने जिंकत आहे. @russcsk, तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद.”

(हे ही वाचा: या फोटोत लपलाय बिबट्या, तुम्ही शोधू शकता का?)

(हे ही वाचा: अन् तो वाघाच्या मागे चालू लागला…; हा Viral Video एकदा बघाच!)

राउफ सध्या ऑस्ट्रेलियन लीग बिग बॅशमध्ये मेलबर्न स्टार्सकडून खेळत आहे. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांमध्ये या पाकिस्तानी गोलंदाजाने तीन विकेट घेतल्या आहेत.

Story img Loader