Viral video: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. नुकताच धोनीच्या मुलाखतीचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्याचबरोबर आता धोनीने केलेली एक कृती चाहत्यांच्या मनात घर करुन गेली आहे. धोनीनं फक्त ही एक कृती करत सर्वांची मनं जिंकली आहेत. एमएस धोनी उत्तराखंडमधील त्याच्या मूळ गावी गेला होता. तिथला त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्याचबरोबर धोनीचे चाहतेही हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. धोनीने नेमकं काय केलं, पाहा…

फक्त एक कृती करत चाहत्यांची मनं जिंकली

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल असं नेमकं धोनीनं केलं तरी काय. काही लोक यशाच्या कितीही मोठ्या शिखरावर गेले तरी आपली सुरुवात कुठून झाली होती, हे विसरत नाहीत. धोनीही त्यातलाच एक, याआधीही धोनीचे पाय नेहमी जमिनीवरच असल्याची कित्येक उदाहरणं तुम्ही पाहिली असतील. त्यातलंच हे आणखी एक उदाहरण आता समोर आलं आहे. एमएस धोनी उत्तराखंडमधील त्याच्या मूळ गावी पोहोचला होता, जिथे तो गावातील रहिवाशांची बोलत होता, यावेळी एक महिला धोनीकडे आली असता धोनीने वयानं मोठ्या असलेल्या महिलेच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. यानंतर महिलेनेही त्याला मिठी मारली. धोनीची ही एक कृती चाहत्यांच्या मनात घर करुन गेली

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओचे खूप कौतुक होत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून, तो आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने पोस्टवर कमेंट केली की, “एकही तो दिल है माही भाई कितनी बार जितोगे”. तर दुसरा युजर म्हणतो “जमिनीवर पाय असणारा क्रिकेटपटू”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “जस्ट लूकिंग लाईक अ वाव” मांजरीनंही फॉलो केला सुपरहिट ट्रेंड; VIDEO पाहून म्हणाल खरंच वाव…

सोशल मीडियात व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक कौतुकाच्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @daksh_papola या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर देत आहेत.

Story img Loader