Dhruv Rathee Lok Sabha Election Exit Polls 2024 : लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या मतदानानंतर १ जूनपासून देशभरातून एक्झिट पोलचे ट्रेंड येऊ लागले. यात आज (४ जून) देशात निवणुकीची मतमोजणी सुरु आहे, सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए बहुमत मिळवताना दिसत आहेत, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया मात्र नाराज होण्याची शक्यता आहे. दुपारपर्यंत इंडिया २२० पेक्षा जास्त जागांवर पुढे आहे. अशात निवडणुकीच्या निकालादरम्यान प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीचे एक ट्विट व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये ध्रुव राठीने एक्झिटपोलची आकडेवारी फसवी असून त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. यासह त्याने अप्रत्यक्षरित्या केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ध्रुव राठीने ट्विटमध्ये नेमक काय लिहिले आहे?

ध्रुव राठीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, एक्झिट पोलच्या फसव्या आकडेवारीची चौकशी व्हायला हवी, हे शेअर मार्केटमध्ये फेरफार करण्यासाठी केले गेले का? की कोणीतरी तसे करण्याची धमकी दिली होती? सध्या राठीचे हे ट्विट चर्चेत आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान ध्रुव राठी भाजपाच्या धोरणांवर सातत्याने प्रश्न उपस्थित करत होता. त्याने भाजपाला डिवचण्याची एकही संधी सोडली नाही, त्याला सोशल मीडियावर अनेकांनी ट्रोल केले, अनेकांनी टोमणे मारले. तर अनेक युजर्स ध्रुव राठीच्या समर्थनासाठी पुढे आले.

ध्रुव राठीचे हे ट्विट शेअर बाजारातील घसरणीच्या संदर्भात आहे. कारण एक्झिट पोलनंतर शेअर बाजारात वाढ झाली होती. पण आज आज शेअर बाजार उघडताच त्यात मोठी घसरण पाहायला मिळाली.

कंगना, रणौत, अरुण गोविल ते निरहुआ…; ‘या’ बॉलीवूड स्टार्सची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?

ध्रुव राठी हा प्रसिद्ध युट्यूबर, व्लॉग आणि सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर आहे. तो सामाजिक, राजकीय आणि पर्यावरणाविषयक समस्यांवरील त्यांच्या युट्यूब व्हिडीओंसाठी ओळखला जातो. मार्च २०२४ मध्ये त्याचे युट्यूबवर अंदाजे २५.०५ दशलक्ष सदस्य आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhruv rathee on loksabha election 204 exit poll fraud questions whether done to manipulate stock market sjr
Show comments