10 Year old Girl Dies After Eating Cake: मागील दोन दिवसांपासून वाढदिवशी मृत्यू ओढवलेल्या चिमुकलीची कहाणी ऐकून सगळ्यांचेच डोळे पाणावत आहेत. सोशल मीडियावर या चिमुकलीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा सुद्धा व्हिडीओ व्हायरल झाला होता. प्राप्त माहितीनुसार, पटियाला येथील ‘केक कान्हा’ या रेस्टॉरंटमधून ऑर्डर केलेला केक खाल्ल्यानंतर या चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबातील इतर सदस्यांनी सुद्धा हा केक खाल्ला होता आणि त्यांची प्रकृती बिघडली होती. या घटनेनंतर रविवारी पोलिसांनी केक कान्हा रेस्टॉरंटमधील तिघांना अटक केली होती आणि आता फूड डिलिव्हरी ॲप झोमॅटोने सुद्धा या रेस्टॉरंटला प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले आहे.

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, कंपनीने हे रेस्टॉरंट त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याची घोषणा करताना असेही सांगितले की संबंधित रेस्टॉरंट मालकाला भविष्यात झोमॅटोवर कोणतीही संस्था चालविण्यास परवानगी दिली जाणार नाही.

CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
gold from woman dead body s neck was stolen
मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला
Fire at birthday party girl shocking video viral on social media
केकवर मेणबत्ती लावली अन् होत्याचं नव्हतं झालं; वाढदिवस साजरा करताना तुम्हीही ‘ही’ चूक करता का? मग हा VIDEO नक्की पाहा
Raghunath More, Raghunath More passed away,
शिवसेनेचे रघुनाथ मोरे यांचे निधन, दिघे यांच्या निधनानंतर साभांळली होती ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय

झोमॅटोच्या प्रवक्त्यांनी बिजनेस टुडेला सांगितले की, “पटियाला येथे नुकत्याच घडलेल्या दु:खद घटनेने आम्हालाही धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच आम्ही झोमॅटो प्लॅटफॉर्मवरून रेस्टॉरंटला तात्काळ डिलिस्ट केले. आम्ही रेस्टॉरंट मालकाला झोमॅटोवर कोणतीही संस्था चालवण्यास मनाई केली आहे. आम्ही या प्रकरणात कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधितांना आमचा पूर्ण पाठिंबा देत आहोत.”

वाढदिवसाला घडलं काय?

ही घटना २४ मार्च रोजी घडली होती. केक खाल्ल्यानंतर काही तासांतच सर्व उपस्थित लोक आजारी पडले आणि मुलीला उलट्या होऊ लागल्या. थोड्या वेळाने ती झोपली, पण २५ मार्चच्या पहाटे ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, पण तेथे पोहोचल्यावर तिला मृत घोषित करण्यात आले.

हे ही वाचा<< निर्दयीपणाचा कळस! चिकन तिखट न बनविल्याने पत्नीला थेट गच्चीवरून फेकले; पाहा धक्कादायक Video

दरम्यान, आतापर्यंतच्या तपासानुसार दाखल केलेल्या अहवालात असा दावाही करण्यात आला आहे की, ऑर्डरच्या बिलाच्या प्रतीमध्ये ‘केक कान्हा’ या हॉटेलचा पत्ता सूचीबद्ध केलेला नाही. पोलिसांना संशय आहे की या रेस्टॉरंटचे काम क्लाउड किचनद्वारे केले जात असावे. अन्य पावतीमध्ये ‘केक कान्हा’ रेस्टॉरंटचे बिल पटियाला येथील नव्हे तर अमृतसरचे असल्याचे आढळून आले होते. या घटनेनंतर, पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 273 (हानिकारक अन्न किंवा पेय विकणे) आणि 304-A (निष्काळजीपणामुळे मृत्यू) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader