Ayodhya Women Falls In Pothole Viral Video: लाइटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला व्हिडिओ समोर आला. व्हिडीओमध्ये , एक महिला रस्त्यावरून चालताना आणि नंतर खड्ड्यात पडताना दिसत आहे, काही लोक तिला वाचवण्यासाठी पुढे सरसावताना दिसत आहेत. ही घटना अयोध्येतील रामपथ जवळील असल्याचा दावा व्हिडीओसह केला जात आहे. काहीच दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात झालेल्या तुफानी पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना सुद्धा घडल्या होत्या त्यामुळे हा व्हिडीओ खराच आहे असे समजून नेटकरी शेअर करत आहेत. आमच्या तपासात या व्हिडीओबाबत काही तथ्य समोर आली आहेत, ती पाहूया ..
काय होत आहे व्हायरल?
X यूजर Ars Lan ने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.
इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हिडीओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून तपास सुरू केला आणि त्यानंतर त्याद्वारे मिळवलेल्या कीफ्रेमवर गूगल रिव्हर्स इमेज सर्च द्वारे शोधले.आम्हाला पोर्तुगीजमध्ये एक बातमी सापडली.
रिपोर्ट मध्ये समान कीफ्रेम्स होत्या. त्यात नमूद करण्यात आले आहे की, “सिआराच्या आतील भागात असलेल्या कॅस्केव्हलमध्ये फुटपाथ तुटल्यावर उघडलेल्या खड्ड्यात एक नागरी सेविका पडली होती. सिटी हॉलनुसार, मारिया रोसिलीन असे या सेविकेचे नाव आहे जी सुखरूप असून लगेचच घरी गेली होती.” हा अहवाल दोन वर्षांपूर्वी २ जून २०२२ रोजी प्रकाशित झाला होता.
अशीच एक बातमी आम्हाला आढळली.
अहवालात म्हटले आहे की, “कॅस्केव्हल (सीई) च्या मध्यभागी असलेल्या एका आस्थापनातील सुरक्षा कॅमेऱ्यांनी तो क्षण रेकॉर्ड केला ज्यामध्ये शहरातील एक सार्वजनिक कर्मचारी खड्ड्यात पडली. एवेनिडा चान्सलर एडसन क्विरोज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मारिया रोसिलीन अशी या महिलेची ओळख आहे जी शहरात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करते.”
आम्हाला आणखी एक मीडिया वेबसाइट सापडली ज्यात व्हिडीओच्या स्क्रीनशॉटसह बातम्यांचा अहवाल दिला होता.
अहवालात नमूद केले आहे: गुरुवारी (2) कॅस्केव्हेल, फोर्टालेझा (CE) येथे फुटपाथवरून चालत असताना एका ४८ वर्षीय महिलेला पाण्याने भरलेल्या खड्ड्याने गिळले होते. G1 ला दिलेल्या मुलाखतीत, मारिया रोसिलीन आल्मेडा डी सूझा म्हणाली की घटनास्थळी कोणतेही डेंजरचे चिन्ह लावले नसल्याने अनावधानाने हा अपघात झाला.
निष्कर्ष: ब्राझीलमधील कॅस्केव्हल येथील एका महिलेचा रस्त्यातील खड्ड्यामध्ये पडतानाचा व्हिडीओ अयोध्येचा सांगून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हायरल दावा खोटा आहे.