Narendra Modi In Radhika- Anant Ambani Wedding: लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असणारा एक फोटो आढळून आला. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्यासमोर नतमस्तक होताना दिसत होते. आपल्याला माहीतच असेल की, भारतातील सर्वात गाजलेल्या लग्नात म्हणजेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित होते. मोदींनी नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद दिल्यावर तिथे उपस्थित असणाऱ्या मुकेश अंबानी व नीता अंबानी यांची सुद्धा भेट घेतली होती. तसेच विवाहसोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या शंकराचार्यांचा सुद्धा मोदींनी आशीर्वाद घेतला होता. याच भेटीनंतर एक फोटो व्हायरल होत आहे, यामागे नेमकं काय तथ्य आहे हे पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Thakur Kuldeep Singh ने एडिटेड फोटो आपल्या प्रोफाइलवर शेअर केला होता.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…
Muramba
फिल्मी स्टाइलने अक्षयने रमाला केले प्रपोज; गोड नात्याची नव्याने होणार सुरुवात, ‘मुरांबा’ मालिकेत मोठा ट्विस्ट
a young man paati goes viral on social media
“..तेव्हाच मंदिरातील माऊली प्रसन्न होईल” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO एकदा पाहाच
narendra modi akola public rally
मोदींच्या सभेसाठी अकोल्यात जय्यत तयारी; काय बोलणार याकडे लक्ष?
raha kapoor birthday mommy alia bhatt shares sweet picture and write special post
“तू फक्त काही आठवड्यांची होतीस…”, लाडक्या लेकीच्या वाढदिवशी आलियाने शेअर केला २ वर्षांपूर्वीचा फोटो, राहाला म्हणाली…

इतर वापरकर्ते देखील हाच फोटो शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही इमेजवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला. आम्हाला लेखासह गुजराती वेबसाइटवर अपलोड केलेला मूळ फोटो सापडला. या वेबसाइटवरील महिलेचा फोटो नीता अंबानींचा नव्हता.

रिपोर्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर दिसणारी महिला दीपिका मंडल असल्याचे नमूद केले आहे. हा फोटो २०१५ चा असल्याचे सांगण्यात आले.

अहवालात नमूद केले आहे की, दीपिका मंडल या दिल्लीस्थित एनजीओ ‘दिव्य ज्योती कल्चरल ऑर्गनायझेशन अँड वेलफेअर सोसायटी’च्या मुख्य अधिकारी आहेत. दीपिका मंडल ज्या एनजीओमध्ये काम करतात ती संस्था भारतीय कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देते. या एनजीओमध्ये कला आणि संस्कृती शिक्षण आणि आदिवासी साक्षरता यावर काम केले जाते तसेच आदिवासींना व्यावसायिक प्रशिक्षण देखील दिले जाते.

Oneindia.com वरील लेखावर आम्हाला या फोटोविषयीचा अहवाल देखील सापडला.

रिपोर्टमध्ये दीपिका मंडल यांचे अनेक सेलिब्रिटींसह फोटो असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

२०२१ मध्ये सुद्धा हा एडिट केलेला फोटो व्हायरल झाला होता.

हे ही वाचा<< VIDEO: लोकलच्या गर्दीतले पाय टाळ-मृदुंग ऐकून थांबले; मुंबईतही आषाढीचा उत्साह, सीएसएमटी स्थानकावर जमला वैष्णवांचा मेळा

निष्कर्ष: नीता अंबानींसमोर नतमस्तक झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हायरल फोटो एडिट करण्यात आला आहे. मूळ फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती दीपिका मंडल या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आहेत. व्हायरल दावे खोटे आहेत.