Nita Ambani Gifted Rohit Sharma a Bugatti: रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला चाव्यांचा सेट देतानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये असा दावा केला आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकल्यानंतर नीता अंबानी यांनी रोहितला लक्झरी बुगाटी कार भेट स्वरुप दिली आहे. पण रोहित शर्माला अंबानी कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून अशी भेटवस्तू मिळाल्याचे कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आणि हे व्हायरल झालेले फोटो एआयचा वापरून तयार केले गेले आहेत. तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत आणि व्हायरल फोटोमागील सत्य शोधणार आहोत.

काय होत आहे व्हायरल? (Viral Photos)

https://www.facebook.com/groups/shubmangillofficial/permalink/1565482390781856/?rdid=gvZLbmy002lJP00G#

तपास : (Fact Check)

जेव्हा आम्ही फोटो पाहाल तेव्हा तुम्हाला त्यात विचित्र गोष्टी दिसून येईल. पहिल्या फोटोमध्ये नीता अंबानीच्या डाव्या हाताची बोटे दिसत नाही. याशिवाय कारच्या ग्रिलवरील माहिती दिसत नाही. तसेच रोहित शर्माच्या जर्सीवरील इंडिया या शब्दावर विचित्र काहीतरी लिहिलेले आहे जे स्पष्ट दिसत नाही. या सर्व चुकांवरून लक्षात येते की हा फोटो खरा नसून एआय जेनेरेटेड आहे.

या फोटोमध्ये नीता अंबानी आणि रोहित शर्मा यांच्या डोळ्यांभोवती आणि तोंडाभोवती हिरवा रंग दिसत आहे. अंबानी यांचा चेहरा सुद्धा विचित्र दिसत आहे.

नेमकं काय खरं आहे, हे जाणून घेण्यासाठी हायव्ह मॉडरेशनचे टूल आणि साईटइंजिन सारख्या एआय-जनरेटेड कंटेंट डिटेक्टरद्वारे दोन्ही व्हायरल फोटो तपासले.

पहिला फोटो (First Photo )

Nita Ambani Gifted Rohit Sharma a Bugatti
Nita Ambani and Rohit Sharma

पहिल्या फोटोमध्ये, डावीकडे नीता अंबानी आणि उजवीकडे रोहित शर्मा दिसत आहे, दोन्ही हायव्ह मॉडरेशनचे टूल आणि साईटइंजिन टूलनी सांगितले की हा फोटो एआय-जनरेटेड आहे.

हायव्ह मॉडरेशन टूलला ९७.८ टक्के खात्री होती की प्रतिमा एआय-जनरेटेड आहे.

साइटइंजिन टूलला हा फोटो एआय-जनरेटेड असल्याचा ९९ टक्के विश्वास होता.

दुसरा फोटो (Second Photo)

Nita Ambani Gifted Rohit Sharma a Bugatti
Nita Ambani and Rohit Sharma

हायव्ह मॉडरेशनने ९८.१ टक्क्यांसह दुसरा फोटो एआय-जनरेटेड किंवा डीपफेक कंटेंट असल्याचे सांगितले.

त्याचप्रमाणे, साईटइंजिनने ९९ टक्के खात्रीसह हा फोटो एआय वापरून बनवला गेल्याचे सांगितले.

निष्कर्ष: (Result)

एआय-जनरेटेड फोटो व्हायरल झाले आहे ज्यामध्ये खोटा दावा केला आहे की नीता अंबानीने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्माला बुगाटी कार भेट दिली आहे.

Story img Loader