Delhi Metro Passenger Drinking and Peeling Boiled Egg :दिल्ली मेट्रो नेहमीच विचित्र कारणामुळे चर्चेत असते. कधी मेट्रोमध्ये कोणी जोरदार भांडण करते, तर कोणी मेट्रोमध्ये डान्स करते. कधी मेट्रोमध्ये बिकनी परिधान करून फिरताना दिसतात तर कोणी अश्लील चाळे करतात. दिल्ली मेट्र एकापेक्षा एक विचित्र गोष्टी करणाऱ्या लोकांचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. सार्वजनिक ठिकाणी असे वागणे अत्यंत चुकीचे आहे हे माहित असूनही लोक अशा गोष्टी करतात. आता पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोमधील धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करताना एका व्यक्तीने ‘दारू’ प्यायल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून लोकांना डोळ्यांवर विश्वास बसत नाही. पण व्हिडीओमागील सत्य मात्र वेगळेच आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक व्यक्ती मेट्रोने प्रवास करत आहे. त्याच्या हातात एक ग्लास आहे ज्यामध्ये मद्यासारखे दिसणारे पेय आहे. तो तरुण ग्लासामधील पेय पितो आणि त्यानंतर बॅगमधून एक अंडे काढून फोडण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ पाहून सर्वांना असेच वाटते की तो दारू पित आहे पण ते पेय दारू नव्हते. तर दिल्ली मेट्रो प्रवासी ‘अ‍ॅपी फिझ’ हे पेय पित आहे. अ‍ॅपी फिझ’ हे सफरचंदाच्या रसाचे पेय आहे.

प्रश्नातील ही छोटी क्लिप त्या व्यक्तीने त्याच्या ‘फूड रिपब्लिक इंडिया’ या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केली होती. ती लवकरच एक्सवर पोहोचली, जिथे अनेक वापरकर्त्यांनी गृहीत धरले की, तो व्यक्ती सार्वजनिक वाहतुकीत सर्रासुपणे दारू पित आहे.

व्हिडिओमध्ये, तो माणूस उकडलेले अंडे सोलून खात असताना ग्लासमधून ते पेय पिताना दिसत आहे.

या व्हिडिओमुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांनी दिल्ली मेट्रोच्या प्रवाशावर टीका केली असता, त्याने त्याच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये स्पष्ट केले की प्रश्नातील पेय म्हणजे “अ‍ॅपी फिझ” आहे, अल्कोहोल नाही.

व्हिडिओ येथे पहा:

दिल्ली मेट्रो या कारणामुेळे चर्चेत

दिल्ली मेट्रोमध्ये घडणाऱ्या घटनांचे विचित्र व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. गेल्या आठवड्यात, एका रेडिट वापरकर्त्याने एक क्लिप शेअर केली जिथे एक पुरूष दिल्ली मेट्रोच्या कोचमध्ये नाचत आणि गाणे गात असल्याचे दिसून आले.

दुसऱ्या व्हिडिओमध्ये एका महिलेला दिल्ली मेट्रोच्या कोचमध्ये एका पुरूषाने आपली राखीव जागा तिला देण्यास नकार देणाऱ्या पुरुषाशी वाद घालताना दाखवण्यात आले.