Sania Mirza & Mohammad Shami Wedding Viral Photo: भारतीय माजी टेनिसपटू सानिया मिर्झाने भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीशी लग्न केल्याचा दावा करत लाइटहाऊस जर्नालिज्मला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे लक्षात आले. या मुद्द्यावर सानिया मिर्झाच्या वडिलांनी स्पष्टीकरण दिले आहे. सानिया मिर्झाचा शोएब मलिकसह घटस्फोट झाल्यानंतर ही अफवा पसरत आहे, यावर सानियाच्या वडिलांकडून आलेलं स्पष्टीकरण व या मुद्द्याचं सत्य जाणून घेऊया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक युजर Alee Shahbaz ने व्हायरल पोस्ट आपल्या प्रोफाइल वर शेअर केली.

इतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनीही त्यांच्या प्रोफाइलवर पोस्ट शेअर केल्या आहेत.

तपास:

आम्ही एका साध्या गूगल कीवर्ड शोधाने आमची तपासणी सुरू केली आणि NDTV वर एक बातमी आढळली.

https://sports.ndtv.com/cricket/on-sania-mirza-mohammed-shami-wedding-rumours-tennis-icons-father-imran-reacts-strongly-5934307

अहवालात नमूद केले आहे की, सानिया मिर्झाचे वडील इम्रान यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, “हे सगळे खोटे आहे. ती त्याला भेटलीही नाही.”

लोकसत्तानेही यावर एक वृत्त प्रकाशित केले आहे.

त्यानंतर आम्ही पोस्टसह वापरलेला फोटो तपासला. फोटोवर गूगल रिव्हर्स इमेज सर्च करता आम्हाला आढळले की सोशल मीडियावर फिरत असलेला फोटो एडिट केलेला. प्रत्यक्षात २०१० मध्ये हैदराबादमध्ये सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमधील हा फोटो आहे.

https://photogallery.indiatimes.com/events/hyderabad/sania-shoaibs-reception/articleshow/5813334.cms

मोहम्मद शमीचा चेहरा शोएब मलिकच्या ठिकाणी एडिट करून जोडलेला आहे. कोलाजमधला सानिया मिर्झाचा सोलो फोटो तिच्या लग्नाचा आहे.

तिने याप्रसंगी तिच्या आईच्या लग्नातील साडी नेसलेली होती.

आणि मोहम्मद शमीचा तिसरा फोटो या वर्षाच्या सुरुवातीचा आहे. त्याने जानेवारी २०२४ मध्ये इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केले होते.

निष्कर्ष: सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमीच्या लग्नाचा व्हायरल फोटो एडिटेड व खोटा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did sania mirza marry mohammad shami wedding photos going viral shoaib malik ex wife father imran explains sania shami did not meet fact check svs