ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्माच्या लोकांचा मुख्य सण आहे. हा सण जगभरात येशू ख्रिस्ताच्या कोटी अनुयायांसाठी पवित्रतेचा संदेश घेऊन येतो. येशू ख्रिस्ताच्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा हा सण आनंदचा सण आहे .या दिवशी लोक येशू ख्रिस्त आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण करतात. ख्रिस्ती बांधव दिवे लावतात, एकमेकांना भेटवस्तू देतात, प्रार्थना करतात. अनेक ख्रिस्ती बांधव आपल्या घराची, ख्रिसमस ट्रिची सजावट करतात. चॉकलेट, कुकीज आणि केक तयार करतात. एक व्यक्ती सांताक्लॉजच्या वेषात येतो आणि लहान मुलांना भेटवस्तू देते.
सातांक्लॉजच्या स्वागतासाठी गायले जाणारे जिंगल बेल हे गाणे तुम्हाला माहित असेलच. आतापर्यंत हे गाणे तुम्ही इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये ऐकले असेल पण तुम्ही याचे मराठी स्वरुप ऐकले आहे का? होय, तुम्ही योग्य तेच ऐकताय, आता जिंगल बेलचे मराठी गाणे देखील आले आहे. सध्या सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मराठी भाषेतील हे गाणे लोकांना खूप आवडले आहे.
इंस्टाग्रामवर maithilyapte आणि niharshembekar या अकांउटवर मराठी जिंगल बेल गाणे पोस्ट केले आहे. मैथिली आपटे आणि निहार शेंबेकर हे दोघेही गायक आहे आणि विविध गाणी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. सध्या त्यांनी गायलेल्या ‘घरघंटी’ या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अगदी साध्या सोप्या मराठी भाषेत हे मराठी जिंगल बेल गाणे तयार केले आहे.
हेही वाचा – Video: संजू सॅमसनचा मैदानातील ‘बाहुबली लूक’ व्हायरल! IPL 2024 आधी समोर आले त्याच्या ‘Bicep’ गुपित
हेही वाचा – इथं ‘तो’, तिथं ‘ती’, दोघांच्याही वेगवेगळ्या विमानाचा एकाच दिवशी झाला अपघात; पण नंतर जो चमत्कार घडला…
काय आहे गाण्याचे बोल?
वेगे बर्फातून, घोडागाडीतून,
शुभ्र पांढऱ्या बर्फामधूनी जाऊ पुढे पुढे…
घरघंटी किणकिणती घंटा चोहीकडे
गंमत वाटे, घोडागाडी घसरत जाई पुढे…
सांताक्लॉज आला, करू आनंदाला,
भेट देऊ या प्रीत जगाला…
घरघंटी किणकिणती घंटा चोहीकडे
गंमत वाटे घोडागाडी घसरत जाई पुढे
व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले की, “अरेच्चा….हे तर काहीतरी आगळ वेगळंच की ….पण एकदम भारीच…की” दुसरा म्हणाला की, “कमाल! तिसरा म्हणाला, “खूप सुंदर” चौथा व्यक्ती म्हणाला, “एकच नंबर” पाचवा व्यक्ती म्हणाला, “जुन्या क्लासिक गाण्याला किती विलक्षण स्वरुप दिले आहे”