Optical Illusion Personality Test: तुम्हाला दिसलेलं हे अत्यंत सुंदर चित्र पाहून सगळ्यात आधी तुमच्या डोक्यात कोणता विचार आला? असं विचारण्याचं कारण म्हणजे अनेकदा आपण एखाद्या गोष्टीकडे जसे पाहतो त्यावरून आपल्या आयुष्याचा दृष्टिकोन कसा आहे हे लक्षात येते. आज सुद्धा या चित्रात तुम्हाला सगळ्यात आधी दिसलेली गोष्ट तुम्ही कामाच्या ठिकाणी आपलं स्थान कसे जपून ठेवता याविषयी बरंच काही सांगून जाते. तसेच काम करताना तुमचा दृष्टिकोन, नियम, शिस्त कशी असते त्याचा तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर कसा प्रभाव पडतो हे आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी तुम्ही सुद्धा खाली दिलेले हे चित्र नीट पाहून घ्या. तुम्हाला सगळ्यात आधी यामध्ये काय दिसतंय ते ठरवा आणि मग त्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नीट वाचा.

Optical Illusion Personality Test
तुमच्या कामाची पद्धत कशी ओळखाल? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

जर तुम्हाला यात महिला दिसली असेल..

जर तुम्ही पहिल्यांदा झाडे आणि फुलांनी वेढलेली एक स्त्री दिसली असेल तर यातून हे लक्षात येते की आपणही अनेक गोष्टींमध्ये गुंतलेले आहात. वेगवेगळ्या विचारांशी झुंजताना आपल्याला दिशाहीन वाटू शकते आणि परिणामी आपल्याच प्रिय व्यक्तींसह वेळ घालवण्याची संधी आपण अनेकदा दवडून बसता. हाच स्वभाव कामाच्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतो. आपल्याला अनेक गोष्टी जमत असूनही केवळ आपण त्या ओळखत नसल्याने अनेक संधी गमवाव्या लागतात. जर तुम्हाला यात फक्त स्त्रीच दिसली असेल तर याचा अर्थ असाही होऊ शकतो की आपण खूप समाधानी वृत्तीचे आहात आपल्याला आनंदाची पातळी वाढवण्यासाठी स्पर्धेत सहभागी व्हायचे नाही. पण तरीही आपण मागे पडतोय अशी भीती तुम्हाला सतावते परिणामी काही वेळा आपणही अधिक साहसी व्हायला हवे. आपणही लोकांशी बोलायला हवे अशी तुमची इच्छा होते. तुम्ही संवादासाठी तळमळत असता पण तरीही तुम्हाला लोकांशी जुळवून घेणं कठीण पडतं. आपण परिस्थितीचा अभ्यास करायला शिकायला हवे आणि त्यानुसार शांतपणे निर्णय घ्यायला हवे. तसेच काही गोष्टींचे पैलू उलगडून पाहायला हवेत.

how to avoid Discord in the family
सांदीत सापडलेले… : मतभेद
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Old man sell samosa poha on Road not for money motivational story of udaipur rajasthan
“पैशासाठी नाहीरे…” या आजोबांच्या कष्टामागचं कारण ऐकून तुमचाही जगण्याचा दृष्टीकोन बदलेल; वाचा नक्की काय घडलं?
viral video shows son goes on hunger strike for iPhone
फूल विक्रेत्या आईकडे आयफोन घेण्यासाठी हट्ट; लेकराने केलं तीन दिवस उपोषण; VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप म्हणाले, ‘काळानुसार मुलंही…’
Kolkata Doctor Rape and Murder Case Kshitija Ghosalkar shared heart wrenching poem
Video: “अत्याचाराच्या रक्ताचा टीळा माथ्यावर लावून…”, कोलकाता डॉक्टर बलात्कार प्रकरणावर प्रथमेश परबच्या पत्नीने कविवेतून मांडलं परखड मत
nutritious sweet potato kheer
श्रावणातल्या उपवासात आवर्जून बनवा ‘रताळ्याची पौष्टिक खीर’; नोट करा साहित्य आणि कृती
17th August 2024 Shanivar Rashi Bhavishya
१७ ऑगस्ट पंचांग: अचानक धनलाभ, व्यापारात यश ते ‘या’ राशीला परदेशात जाण्याचा योग; श्रावणातल्या दुसऱ्या शनिवारी कोणत्या राशीवर असणार शनिदेवाची कृपा? वाचा तुमचं भविष्य
Dudhache Pedha at home during the festival
सणासुदीला घरीच बनवा ‘दुधाचे पेढे’; नोट करा साहित्य अन् कृती

हे ही वाचा<< पुणे अन् मुंबईपासून जवळ असलेले हे निसर्गरम्य व सुंदर ठिकाण पाहिले का? VIDEO एकदा पाहाच

आपल्याला पाने फुले दिसली असतील तर..

जर तुम्हाला सुरुवातीला पाने फुले दिसली असतील तर तुम्ही इतरांपेक्षा वेगळ्या बाजूने गोष्टींकडे पाहता. यामुळे कामाच्या ठिकाणी नेहमी तुमचं कौतुक होत असतं. तुम्ही स्वतः एक वचनबद्ध कर्मचारी आहात. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचा सुद्धा आदर आहे. पण तुम्हाला अनेकदा आपण पुरेसं यश साध्य न केल्याच्या भावनेने खचून जाता. सतत स्वतःला सिद्ध करण्याचा हट्ट तुम्हाला काही वेळा इतरांपासून तोडू शकतो. तुमच्या मताचा काहींना दबाव वाटू शकतो. आपण नेतृत्व करण्यापेक्षा एखाद्याला फॉलो करण्यात अधिक यशस्वी ठरता. आपण बुद्धीने हुशार असल्याने आपल्याकडून प्रचंड अपेक्षा केल्या जातात त्या पूर्ण करताना आपली दमछाक होते.