हिंदू धर्मात श्रीगणेशाला आराध्य दैवत मानलं जातं. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही गणेशाच्या पूजनानंतरच होते. गणपती म्हणजे बुद्धी-समृद्धी-सौभाग्याची देवता, सुखकर्ता, विघ्नहर्ता, १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती. याच श्रीगणेशचा उत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा गणेश चतुर्थीचा सण शुक्रवारी १० सप्टेंबर रोजी संपूर्ण देशभरात उत्साहाने या उत्सवासाठीची सुरुवात झाली आहे. देशभरात गणेश चतुर्थी उत्साहात साजरी केली जात आहे. उत्सव जोरात सुरू असताना, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विविध प्रकारच्या गणेशमूर्तींचे फोटो आणि व्हिडीओ भरले आहेत. त्यांच्या दरम्यान, चॉकलेट मूर्तीचा व्हायरल व्हिडीओ आता लोकांना आश्चर्यचकित करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कशी तयार झाली ही मूर्ती?

रेस्टॉरेटर आणि चॉकलेटियर हरजिंदर सिंग कुकरेजा यांनी इन्स्टाग्रामवर चॉकलेट मूर्तीचा व्हिडीओ शेअर केला. “चॉकलेट गणेशा – चॉकलेट गणेशाचे हे सलग सहावे वर्ष आहे! हे इको-फ्रेंडली गणेश बनवण्यासाठी १० शेफ, १० दिवस आणि २०० हून अधिक किलो बेल्जियम चॉकलेट लागले. ” मूर्तीचे दुधात विसर्जन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर चॉकलेट दुधाचा प्रसाद झोपडपट्टी भागातील वंचित मुलांमध्ये वाटला जाईल.

नेटीझन्सची पसंती

हा व्हिडीओ १० तारखेला शेअर करण्यात आला आहे. शेअर केल्यापासून या व्हिडीओला १२ हजाराहून जास्त लोकांनी लाईक केले आहे तर अनेकांनी या व्हिडीओला बघितलं आहे. या व्हिडीओवर अनेक वापरकर्त्यांनी कमेंट्सही केल्या आहेत. “हे आश्चर्यकारक आहे,” इन्स्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले. “खूप सुंदर,” दुसरा वापरकर्ता व्यक्त झाला. “हे अमेझिंग आहे,” तिसऱ्याने कमेंट केली. अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दर्शविण्यासाठी हृदय किंवा फायर इमोटिकॉन्स देखील शेअर केले.

तुम्हाला कसा वाटला हा चॉकलेट गणेशा?