अस्वलांच्या बछड्यांचा एक अतिशय मोहक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे आणि आम्हाला खात्री आहे की हा व्हिडीओ तुम्हाला हसवेल. हॉपकिन्सबीआरएफसी २१ नावाच्या ट्विटर खात्याने १५ सेकंदांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि हा व्हिडीओ पोस्ट केल्याच्या काही तासात ७,५०० हून जास्त व्ह्यूजसह त्याला मिळाले आहेत. या छोट्या व्हिडीओमध्ये पूल पार्टीचा आनंद घेताना अनेक अस्वल दिसत आहेत.
काय आहे व्हिडीओमध्ये?
एका बागेत, दोन अस्वलांच्या पिल्लांनी पूलमध्ये त्यांचा जास्तीत जास्त वेळ घालवला तर दुसऱ्याने त्यांच्यात सामील होण्याचा अनेक प्रयत्न केले. दुसरीकडे, आणखी दोन अस्वल पार्कच्या दुसऱ्या टोकावर चटईसह खेळताना दिसले तर दुसरा स्विंगमध्ये व्यस्त होता. तसेच, स्लाइडवर आणखी एक अस्वल खेळताना दिसते. हे इतके सुंदर दृश्य आहे की आम्हाला खात्री आहे की तुम्ही हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघाल.
नेटीझन्सची प्रतिक्रिया
व्हिडिओ व्हायरल होताच, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी पोस्टच्या कमेंट विभागात त्यांचे विचार सामायिक केले. काहींनी हार्ट इमोटिकॉन्स देखील पोस्ट केले.
तुम्हाला कशी वाटली ही पूल पार्टी?