Optical Illusion: सोशल मीडियावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडं खूप चर्चेत आहे. या चित्रात निळे आणि लाल ठिपके आहेत. लाल ठिपक्यांना जोडून इंग्रजी अक्षर तयार होत आहे जे तुम्हाला शोधायचे आहे. आतापर्यंत अनेक जणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा.

इंग्रजी अक्षर शोधा

या फोटोमध्ये अनेक निळ्या ठिपक्यांमध्ये काही लाल ठिपके दिसत आहेत. या निळ्या ठिपक्यांचे काम तुमचे मन आणि डोळ्यांचं लक्ष विचलित करण्याचं आहे. यासाठी तुम्हाला लाल ठिपके काळजीपूर्वक पहावे लागतील आणि त्यातून तयार होणारे इंग्रजी अक्षर शोधावे लागेल.

( हे ही वाचा: Optical Illusion: चित्रामधील लपलेले ९ चेहरे तुम्ही शोधू शकता का? ९९% लोकं ठरलीत अपयशी)

हे बरोबर उत्तर आहे

जितक्या लवकर तुम्ही अक्षर शोधाल तितकीच तुमची स्मरणशक्ती देखील चांगली होईल. फोटो सतत बघून तुम्ही योग्य उत्तर मिळवू शकता. तुम्हाला अजूनही योग्य उत्तर मिळाले नाही तर, डोळे मिटून लाल ठिपक्यांच्या स्थितीची कल्पना करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला उत्तर मिळत नसेल तर काळजी करू नका, आम्ही तुम्हाला योग्य उत्तर सांगणार आहोत. लाल ठिपके जोडून इंग्रजीचे ‘G’ अक्षर बनत आहे.

फोटो व्हायरल होत आहे

या फोटोने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की केवळ १% लोकांनी या प्रश्नाचे अचूक उत्तर दिले आहे. तुम्ही सुद्धा बरोबर उत्तर दिले असेल तर अभिनंदन, स्मरणशक्ती तीव्र असलेल्या लोकांच्या यादीत तुम्हीही सामील झाला आहात. आता हेच कोडे तुम्ही तुमच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांना पाठवू शकता आणि त्याच्या स्मरणशक्तीची टेस्ट घेऊ शकता.

Story img Loader