काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी मंगळवारी ट्विटरवर राज कपूर यांचे लोकप्रिय गाणं ‘जीना यहाँ मरना यहाँ’ गातानाचा व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आतापर्यंत २ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ जयपूरमधील लाइव्ह कॉन्सर्टचा आहे. या छोट्या व्हिडीओमध्ये सचिन पायलट काही लोकांसोबत स्टेजवर दिसत आहे. त्याच्या हातात माईक देखील आहे आणि यादरम्यान ते १९७० मध्ये आलेल्या मेरा नाम जोकर या चित्रपटातील गाण्याच्या काही ओळी गात आहे. कोरसमध्ये त्याच्यासोबत आणखी लोक त्यांना साथ देताना दिसतात.
व्हिडीओ व्हायरल
सचिन पायलटने त्यांच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये गाण्याचे बोल लिहिले आहेत, “जीना यहां, मरना यहां, इसके सिवा जाना कहां.” त्याचा आवाज लोकांना खूप आवडला आहे. त्यांचा असा सुरेल आवाज ऐकून लोकही त्यांच्या गायकीचे चाहते झाले आहेत. बरेच लोक असेही म्हणतात की ते एक चांगला नेता असण्याबरोबरच एक चांगले गायक देखील आहेत.
(हे ही वाचा: कृतज्ञता! रस्ता ओलांडण्यासाठी गाडी थांबवणाऱ्याचे हत्तीने अनोख्या पद्धतीने मानले आभार; Video Viral)
नेटीझन्सची पसंती
लोक व्हिडीओवर भरपूर कमेंट करत आहेत आणि सचिन पायलट यांच्या आवाजाचे कौतुक करत आहेत. एका यूजरने म्हटले, “चांगला आवाज सचिन जी,” दुसऱ्या यूजरने “तुमचा आवाज खूप गोड आहे” अशी कमेंट केली.
(हे ही वाचा: पिंजऱ्याचे गेट उघडताच सिंहाने केअरटेकरवर मारली उडी अन्… बघा Viral Video)
‘जीना यहाँ मरना यहाँ’ हे गाणे मुकेश यांनी गायले आहे. याला संगीत शंकर जयकिशन यांनी दिले होते आणि गीत शैलेंद्र आणि शैली शैलेंद्र यांनी लिहिले होते.