भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या एक खेळाडू म्हणून त्याच्या खेळाचा आनंद नेहमीच घेत असतो. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत असाच एक क्षण दिसला. कोहलीला फलंदाजीत कामगिरी करता आली नसली तरी त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात असाधारण झेल घेतला. जेव्हा कोहलीने हा जबरदस्त झेल घेतला तेव्हा भारतीय संघाला या विकेटची नितांत गरज होती आणि टीम इंडियाने पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने खेळात पुनरागमन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय गोलंदाजी आक्रमणाची सुरुवात चांगली झाली आणि वेस्ट इंडिज २० षटकांत ५ गडी गमावून ७ धावांवर कठीण स्थितीत होते. पण समरा ब्रूक्सने विंडीजच्या डावात काही चांगले फटके मारले. ऑडियन स्मिथ आणि अकील हुसेन यांनीही काही हार्ड हिटिंग शॉट्स सादर केले. शेवटच्या षटकात स्मिथ ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, ते पाहता रोहित शर्माला ४५व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरकडे चेंडू सोपवावा लागला. सुंदरचे दोन चेंडू स्मिथने सीमापार पाठवले पण एका चेंडूवर कोहलीने झेल घेतला. चेंडू हवेत इतका उंच झेप घेत होता की कोहलीला झेल घेण्यास पुरेसा वेळ मिळाला होता, पण माजी कर्णधार झेल घेण्याच्या प्रयत्नात स्वत:ला पडण्यापासून रोखू शकला नाही.

(हे ही वाचा: Video Viral: ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ गाण्यावरचा चिमुकल्याचा डान्स एकदा बघाच!)

श्रीवल्ली गाण्याच्या डान्स स्टेप्स

पडताना कोहलीच्या डोक्याच्या मागच्या बाजूलाही दुखापत झाली पण त्याने झेल सोडला नाही. डीप मिड-विकेटमध्ये शानदार झेल घेतल्यानंतर कोहलीने पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाण्याच्या डान्स स्टेप्स सादर केल्या, जो सध्या सोशल मीडियावरचा ट्रेंड आहे.

(हे ही वाचा: वर्गात मुलांनी शिक्षिकेसमोर दाखवलं आपलं अनोखं टॅलेंट; हा Viral Video एकदा बघाचं)

(हे ही वाचा: Video: आता लग्नसोहळ्यावरही ‘पुष्पा’ची क्रेझ! नवरदेव म्हणतो ‘मैं झुकेगा नहीं…’)

भारताचा मोठा विजय

प्रथम फलंदाजी करताना भारताने २३७ धावा केल्या होत्या आणि टीम इंडियाने वेस्ट इंडिजला हे लक्ष्य गाठू दिले नाही. भारतीय संघाने शानदार विजय मिळवला ज्यात वेस्ट इंडिजचा ४४ धावांनी पराभव झाला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did you see virat kohli srivalli style dance video viral after a great catch ttg