दररोज चौका-चौकात किंवा ट्रेनमध्ये आपल्याला अनेक भिकारी दिसतात. अनेकदा काही भिकारी वेगवेगळ्या प्रकारे भीक मागताना दिसतात. त्यात ट्रेनच्या जनरल डब्यात अनेकदा वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाऊन भिकारी भीक मागताना दिसतात. काही वेळा भिकारी अशी काही मजेशीर कृत्ये करतात; जी पाहून लोकांना हसू आवरत नाही. अशाच एका भिकाऱ्याचा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा भिकारी गाणी गाऊन नाही, तर एका वेगळ्याच पद्धतीने भीक मागताना दिसत आहे; जे पाहून लोक त्याला डिजिटल भिकारी, असे म्हणत आहेत. या भिकाऱ्याने भीक मागण्यासाठी स्वत:ला अपडेट केले आहे.
हातात क्यूआर कोड घेत मागतोय भीक
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक भिकारी हातात क्यूआर कोड घेऊन ट्रेनमधील प्रवाशांकडून भीक मागत आहे. हा व्हिडीओ ट्रेनमधील एका प्रवाशाने रेकॉर्ड करत शेअर केला आहे; जो आता खूप व्हायरल होत आहे. अनेकदा आपण पाहतो की, ट्रेनमध्ये जेव्हा एखादा भिकारी प्रवाशाकडे पैसे मागण्यासाठी जातो तेव्हा काही प्रवाशांकडे वेळ नसतो, काही लोक सुटे पैसे नाहीत; पुढे जा, माफ कर म्हणत टाळतात. पण आाता हा भिकारी ज्या प्रकारे भीक मागत आहे ते पाहून कोणतेही कारण सांगणे तुम्हाला अवघड होईल. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लोकल ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी आहे आणि भिकारी जोरजोरात गाणी म्हणत हातात क्यूआर कोड घेऊन भीक मागत आहे. यावेळी भिकाऱ्याची अनोखी पद्धत पाहून उभे असलेले प्रवासी त्याच्याकडून पाहून हसत आहेत.
हेही वाचा : समुद्रातील लाटांची भीषणता, पत्त्यासारखी कोसळली इमारतीची बाल्कनी; पाहा हृदय हेलावून टाकणारा Video
ट्रेनमध्ये डिजिटल पद्धतीने भीक मागण्यासंबंधीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे; ज्यावर युजर्सदेखील वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. यापूर्वीही हातात क्यूआर कोड घेऊन रस्त्याच्या कडेला उभे राहून भीक मागणाऱ्या भिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण आता व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ मुंबई लोकलमधील असून, जिथे एक भिकारी गाणी म्हणत क्यूआर कोडद्वारे भीक मागताना दिसत आहे. अनेकदा मुंबई लोकलमधील वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. कधी प्रवाशांच्या भांडणाचा; तर कधी ट्रेनमध्ये चढणाऱ्या लोकांच्या गर्दीचा व्हिडीओ व्हायरल होतो. मुंबई लोकलमधील प्रवास हा अनेकांना अशा वेगवेगळ्या आठवणी देणाराही असतो.