तुम्हाला रस्त्यावर, ट्रेनमध्ये, चौकाचौकात भिकारी भिक मागताना दिसतात. मंदिराच्या बाहेर किंवा दुकानांबाहेर भिकारी हमखास धडकतील. आजकाल तर भिकारीही वेगवेगळ्या स्टाईलने भिक मागतात. अनेक लोक त्यांना पैसै देतात तर काहीजण सुट्टे पैसै नसल्याचं कारण सांगून त्यांना पळवतात. मात्र आता भिकारीही हुशार झाले आहेत. पैसै मिळवण्यासाठी नवनव्या ट्रिक ते शोधून काढतात. अशातच एका ‘डिजिटल भिकारी’चा व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भिकारी हातात क्यूआर कोड घेऊन लोकांना भीक मागत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, यामध्ये एक लहान मुलगी रस्त्यावर भीक मागत आहे. भीक मागत असताना अनेक जण आमच्याकडे सुट्टे पैसे नाहीत सांगतात. सुट्टे पैसे नाहीत म्हणून भीक देत नाहीत. त्यामुळे या मुलीने असं करणाऱ्या लोकांकडून पैसे मिळवण्यासाठी थेट क्यूआरकोड आणला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> जम्मू-काश्मीरमध्ये लेन बदलण्याच्या नादात व्हॅनमधील चौघांचा गेला जीव; भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल
मुलीच्या हातातला क्यूआर कोड पाहून ही मुलं चकित होतात. @sutta_gram नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ देखील एडिट करण्यात आला आहे. यामध्ये मोदी त्यांची डिजिटल इंडियाची संकल्पना सांगत आहेत.