Dirty Ice Cream Making Video : आईस्क्रीम हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे. लहान मुले असोत की वयस्कर व्यक्ती, सर्वांनाच आईस्क्रीम खायला आवडते. लोक केवळ उन्हाळ्यात नाही तर कोणत्याही ऋतूत आवडीने आईस्क्रीम खातात. त्यामुळे बाजारातही अनेक वेगवेगळ्या फ्लेवर्सची आईस्क्रीम पाहायला मिळतात. विशेष म्हणजे अगदी पाच रुपयांपासून ते ५००, १००० रुपयांपर्यंत आईस्क्रीम मिळतात. पण, अनेक जण स्वस्तातील पाच रुपयांचे आईस्क्रीम खाणे पसंत करतात. पण, हे पाच रुपयांना मिळणारे आईस्क्रीम कशाप्रकारे बनवले जाते हे जर तुम्ही पाहिलं ना, तर तुम्हाला पुन्हा आईस्क्रीम खाण्याची इच्छा होणार नाही. सध्या सोशल मीडियावर आईस्क्रीम बनवतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात ती व्यक्ती इतक्या किळसवाण्या प्रकारे हाताने सर्व आईस्क्रीमचे कप भरतेय की, हा व्हिडीओ पाहून अनेक जण संताप व्यक्त करत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा