आपल्या पैकी कोणाला केक खायला आवडत नाही? कोणाचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा कोणाच्या आयुष्याची चांगली सुरवात म्हणून आपण केके कापतो आणि आपला आनंद साजरा करतो. आपण हा केक आवडीने खातो सुद्धा. परंतु आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल. अस्वच्छतेबाबत यापूर्वी अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र हे पदार्थ कुठे बनतात कसे बनतात याबद्दल आपल्याला काही माहित नसते. असाच एक किळसवाना व्हिडीओ समोर आला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये मोठी बेकरी दिसत असून ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केक बनवण्याची प्रोसेस सुरु आहे. व्हिडिओमध्ये एक कामगार अंडी आणि मैदा यांचे मिश्रण तयार करून त्यात तेल किंवा पाणी टाकून पीठ फेटून घेतो. मग वर्तमानपत्र लागलेल्या ट्रेमध्ये हे बॅटर टाकून तो ट्रे ओवनमध्ये बेक करण्यासाठी टाकतो. यावेळी या व्यक्तिंनी हातात कोणतेही ग्लोव्ज घातलेले नाहीत किंवा कोणतीही स्वच्छता पाळलेली नाही.
व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने या व्हिडिओला कॅप्शन देत, “मला माहित नव्हते केक असे बनवले जातात” असा कॅप्शन दिला आहे.
व्हायरल व्हिडीओ
हेही वाचा – बापासाठी कायपण! मुलीने वडिलांना गुपचूप दान केली किडनी; नेटकरी म्हणतात..“हे फक्त लेकच करू शकते”
‘स्वच्छता पाळा, आजार दूर ठेवा’ असं म्हटलं जातं. त्यामागे मोठा अर्थ आहे. घर, घराचा परिसर स्वच्छ ठेवल्यास रोगराई येत नाही आणि लोकांचं आरोग्य चांगलं राहतं. या नियमाचं पालन अन्नपदार्थ तयार करतानादेखील महत्त्वाचं आहे; मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ रस्त्यावरचे अन्नपदार्थ खाणाऱ्यांनी पाहिला, तर त्यांना नक्कीच धक्का बसेल.