आयुष्यात कितीही संकटे आली तरी आयुष्य जगता आलं पाहिजे. कष्ट आणि अथक परिश्रमानेच आपण यश गाठू शकतो, असं म्हणतात. जीवनात गरिबापासून श्रीमंतापर्यंत कष्ट कोणालाच चुकलेले नाहीत; फक्त त्याचे स्वरूप वेगवेगळे असू शकते. परंतु, जो तो आपापल्या परीने मेहनत घेतच असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गरीब व्यक्ती पोटाची भूक भागविण्यासाठी मिळेल ते काम करत असतात. त्यात अपंगत्व आलेलं असेल तर आयुष्यात अनेक अडचणींना सामोरं जाण्यासाठी दुप्पट जिद्द आणि मेहनत लागते. अशा परिस्थितीत अनेक माणसं हतबल होतात, निराश होतात आणि स्वत:लाच दोष देऊ लागतात. पण, अशा परिस्थितीतही जिद्दीनं उभं राहत आपलं काम जो करतो, तोच आयुष्यात पुढे जातो. सध्या अशाच एका माणसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक दिव्यांग माणूस हात नसूनही जड गोणी नेण्याचे काम करत आहे.

हेही वाचा… “काळी बिंदी, काळी कुर्ती…”, चिमुकलीच्या डान्सवर सगळेच फिदा, हुबेहुब स्टेप्स करत जिंकलं मन, VIDEO एकदा पाहाच

दोन्ही हात गमावले, पण जिद्द सोडली नाही

दिव्यांग व्यक्तीचा हा व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील. या व्हिडीओमध्ये दोन्ही हात गमावलेल्या एका व्यक्तीची धडपड, मेहनत दिसतेय. आपल्याला हात नाहीत, याचा विचार करून रडत बसण्यापेक्षा या व्यक्तीने परिश्रम करूनच आपलं पोट भरण्याचा निर्णय घेतलाय. हात नसूनही दाताने वजनशीर गोणी उचलत आपल्या खांद्यावर ठेवून ती एका ठिकाणी ठेवण्यासाठी तो जात असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @motivation_life_79 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “और हमे लगता है की हमारी जिन्दगी बोहोत कठीन है” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल एक मिलियन व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… हे फक्त पुण्यातच घडू शकतं! एका पतंगासाठी पठ्ठ्यानं केलं ट्रॅफिक जाम, भररस्त्यात ट्रकवर चढला अन्…, VIDEO पाहून पोट धरून हसाल

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “आयुष्यही अनेकदा आपली परीक्षा घेत असतं.” तर दुसऱ्याने “परिस्थिती कशीही असो, काम करावंच लागतं” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “हे जीवन आपल्याला वाटते तितके सोपे नाही.”