Shocking video: सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत आहेत. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे की, जो कधीही कुठेही लपून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सापाची भीती वाटते. सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. साप म्हणताच अनेकांना घाम फुटतो. पण साप पाळणारे, खाणारेही काही लोक आहेत. शक्यतो असे प्रकार परदेशात पाहायला मिळतात. पण, तुम्हाला धक्का बसेल; कारण यूपीमधूनही असाच एक प्रकार समोर आला आहे. त्यामध्ये एका व्यक्तीने गंगा नदीतील जिवंत साप पकडून खाल्लाय. त्यासंबंधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.
जिवंत साप पकडला, धुतला अन् खाल्ला
ही विचित्र आणि विक्षिप्त घटना उत्तर प्रदेशमधील फतेहपूरमध्ये घडली आहे. साप खाणारी हा व्यक्ती भयंकर गुंड असून, ती नुकतीच तुरुंगातून सुटली आहे. या व्यक्तीचे नाव गंगा प्रसाद आहे. तुरुंगात दीर्घकाळ शिक्षा भोगून आता बाहेर आला आहे. तो नेहमी काही ना काही गैरकृत्ये करीत असल्यामुळे त्याचे आत-बाहेर, असे वारंवार चालूच असते, असे गावातील लोक सांगतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा गुंड नदीजवळ पोहोचतो आणि सुरुवातीला तो आपल्या तळहातात थोडे पाणी गोळा करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते. त्यानंतर तो नदीतून साप पकडतो आणि नंतर काही अपशब्द उच्चारतो. त्यानंतर तो अक्षरश: दाताने सापाचे डोके चावतो आणि पुढे पुढे सापाचे लचके तोडतो.
जेलमधून बाहेर येताच व्यक्तीचं विचित्र कृत्य
हा व्हिडीओ पाच दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. साप पकडला तेव्हा गंगा प्रसाद नदीत मासेमारी करीत असल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले. त्यावेळी गंगा प्रसादने सापाला जिवंत पकडले. त्यानंतर सापाला नदीत धुण्यास सुरुवात केली. सापाला स्वच्छ केल्यानंतर गंगा प्रसाद त्याला खाऊ लागला. तेथे उपस्थित लोकांनी त्याचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “पेट्रोलचे दर स्वत:च्या जबाबदारीवर पहावेत…” पेट्रोल पंपावरील पाटीची जोरदार चर्चा; Photo पाहून पोट धरुन हसाल
हा व्हिडीओ सोशल मीडियावर Ghar Ke Kalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर नेटकरी संताप व्यक्त करीत असून, यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.