Shocking video: आपल्यापैकी अनेकांनी भारतीय रेल्वेतून प्रवास केला असेल. लांब पल्ल्याचा प्रवास असेल तर बसच्या तुलनेत रेल्वेच बरी पडते. कारण एकतर ती वेगानं धावते अन् सर्व प्रकारच्या सोयी सुविधा तुम्हाला रेल्वेमध्ये मिळतात. असो, पण प्रवास करताना चहा पिण्याची मजा काही औरच असते. पण तुम्हाला माहिती आहे का रेल्वेमध्ये विकला जाणारा चहा कसा तयार केला जातो? नाही तर मग हा व्हायरल होणारा व्हिडीओ तुम्ही देखील एकदा पाहाच. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कदाचित तुम्ही देखील ट्रेनमध्ये चहा पिण्यापूर्वी दोन वेळा विचार कराल.

चहा पिताना बहुतेक लोक गृहीत धरतात की तो सामान्यतः एका भांड्यात तयार केला जातो, ज्यात दूध, पाणी, साखर आणि चहाची पाने घालली जातात. जर तुम्ही उच्च दर्जाच्या ठिकाणी चहा पित असाल तर लवंग, वेलची, काळी मिरी आणि आलेही त्यात असतात. पण ट्रेनमधील चहाचे वास्तव काही वेगळेच आहे, जे तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती चक्क ट्रेनच्या टॉयलेटमध्ये चहाचा कंटेनर घेऊन बाथरुम जेट स्प्रेनं तो स्वच्छ केला आहे. आणि आता पुढे त्याच भांड्यात नवीन चहा ओतून तो चहा विकणार आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. अशाप्रकारे जर चहा पिला तर एखाद्याच्या जीवावर हे बेतू शकतं. त्यामुळे रेल्वेतून प्रवास करीत असताना अनधिकृत विक्रेत्यांकडून प्रवाशांनी चहा घेेऊ नयेत, असे आवाहन भारतीय यात्री केंद्राने प्रवाशांना केले आहे. रेल्वेतील चहा विक्रेते टॉयलेटच्या पाण्याचा वापर करून थर्मोसेसमधून चहाची विक्री करीत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहे. तेव्हा प्रवाशांनी अशा विक्रेत्यांकडून चहा घेतल्यानंतर आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती वाढली आहे. भारतीय रेल्वेतून दररोज लाखो लोक प्रवास करतात. अनेक जण काही तास प्रवास करतात, तर अनेक प्रवासी अनेक दिवस ट्रेनमधून प्रवास करतात. या काळात दुसरा कोणताही पर्याय नसल्याने लोक रेल्वेत विकले जाणारे चहा-नाश्ता खाऊन जगतात. रोज शेकडो लोक विचार न करता ट्रेनमध्ये विकला जाणारा चहा पितात, कारण त्यांच्याकडे पर्याय नसतो आणि हे लोक आपल्या घरापासून दूर असतात. मात्र हाच चहा प्यायल्यानं आरोग्यावर काय गंभीर परिणाम होऊ शकतो याचा आपण विचारही करु शकत नाही.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ yt_ayubvlogger23 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून नेटकरी यावर संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत. त्यात एकानं म्हंटलंय, “अशाप्रकारे काहीही करुन जीव घेणार का आता?”

Story img Loader