Railway Tea Video: ट्रेनमधून प्रवास करताय? मग आपल्या घरून नेलेले अन्न खाता की रेल्वेतील? सावधान! चुकूनही रेल्वेतील अन्न खाऊ नका. कारण रेल्वेतील चहा बनवतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हिवाळा असो किंवा पावसाळा कुठल्याही ऋतूमध्ये गरमा गरम चहा प्यायची मजाच काही और असते. अनेकांची सकाळ ही चहाशिवाय होतं नाही. दर्दी चहाप्रेमींना तर चहा प्यायचा बहाणाच लागतो. भारतामध्ये पाहावं तिकडे चहाचे स्टॉल बघायला मिळतात. अगदी भारतीय रेल्वेमधून प्रवास करतानाही आपला जोर चहा पिण्यावर राहतो. पण थांबा… सध्या सोशल मीडियावर भारतीय रेल्वेमधील चहाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे तो पाहून तुम्ही कायमचं चहा प्यायला विसरुन जाल. हा व्हिडीओ पाहून कायम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची झोप उडाली आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन रेल्वे कर्मचारी ट्रेनच्या डब्यामध्ये चहा तयार करत आहेत. चहा किटलीमध्ये दूध गरम केलं जातंय. अन् आश्चर्याची बाब म्हणजे हे दूध चक्क वॉटर बॉयलरच्या मदतीनं गरम केलं जातंय. अतिशय अस्वच्छ पद्धतीने बादलीनं किटलीमध्ये चहा ओतताना पाहायला मिळत आहे. आजूबाजूची जागही अतिशय अस्वच्छ आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही कदाचीत रेल्वेत, रेल्वे स्थानकावर चहा पिणं सोडून द्याल.
दरम्यान, रेल्वे विभागाकडून अन्न बनवण्यासाठी अनेक अटी आणि शर्ती घातल्या आहेत. त्याचबरोबर स्वच्छतेबाबतही अनेक बंधने घातले आहेत. तरीपण अनेकजण या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> शॉर्ट कट महागात पडेल! राँग साईडने गाडी घुसवली; भररस्त्यात राडा, हाणामारीचा VIDEO व्हायरल
हा व्हिडीओ पाहून तुम्ही रेल्वेमध्ये चहाचं नावाच घेणार नाहीत. सोशल मीडियावर या पूर्वी रेल्वेमधील चहा बनविण्यासाठी टॉयलेटचं पाणी वापरण्यात येत असाचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता हा व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडीओ पाहून नेटकरी कारवाईची मागणी करत आहेत. हा व्हिडीओ rohit_mehani या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.